Pune: आयुष कोमकरच्या शरीरात सापडल्या 9 गोळ्या, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आजोबानेच नातवाला संपवलं? चक्रावून टाकणारी स्टोरी!

Pune Ayush Komkar Murder: पुण्यातील नाना पेठ परिसरात 18 वर्षीय आयुष कोमकरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी यश पाटील आणि अमित पटोले यांना अटक केली आहे. ही हत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वनराज आंदेकर हत्येचा बदला असल्याचा तपासात संशय आहे.

pune 9 bullets found in ayush komkar body did grandfather kill his grandson himself to avenge his son vanraj andekars murder

कोमकर हत्या प्रकरणाची खतरनाक कहाणी

ओमकार वाबळे

• 05:55 AM • 09 Sep 2025

follow google news

पुणे: पुण्यातील आयुष (गोविंदा) कोमकरच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी (5 सप्टेंबर) संध्याकाळी नाना पेठमध्ये 18 वर्षीय आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरासह दोन संशयितांना अटक केली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आयुष कोमकर हा गणेश कोमकरचा मुलगा होता. हा तोच गणेश आहे जो गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक होता.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

आयुषच्या आईच्या तक्रारीवरून, पोलिसांनी आयुषचे आजोबा आणि कथित गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्यासह 12 जणांविरुद्ध खून आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना संशय आहे की, 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली होती. वनराज आणि त्याच्या बहिणींमध्ये दीर्घकाळ चाललेल्या मालमत्तेच्या वादाशी हा गुन्हा जोडला गेला होता. वनराजच्या बहिणींचे लग्न जयंत कोमकर आणि गणेश कोमकर या दोन भावांशी झाले होते.

हे ही वाचा>> Pune: पोराचे अंत्यसंस्कार थांबवले, वडील गणेश कोमकरला जेलमधून आणलं तेव्हाच दिला अग्नी.. स्मशानभूमीत नेमकं काय घडलं?

पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी सांगितले की, 'अटक करण्यात आलेल्या दोन आरोपी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय 19 वर्ष) यांचा पूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. ज्यावेळी पाटील याने आयुष कोमकरवर अनेक गोळ्या झाडल्या तेव्हा पटोले हा जवळच बॅकअप म्हणून उभा होता. सीसीटीव्ही फुटेजमधून दोघांची ओळख पटली आणि नंतर पोलिसांच्या दबावाखाली त्यांनी आत्मसमर्पण केले." असे ते म्हणाले.

पोलिसांना अद्याप हल्ल्यात वापरलेली दुचाकी आणि शस्त्रे जप्त केलेली नाहीत. घटनास्थळावरून दहा रिकामे काडतुसे आणि एक जिवंत गोळी जप्त करण्यात आली आहे, तर पोस्टमार्टममध्ये आयुष कोमकरच्या शरीरात तब्बल 9 गोळ्या आढळून आल्या आहेत.

हे ही वाचा>> पुणे: गोविंद कोमकरच्या हत्येची Inside स्टोरी, त्यावेळी नेमकं काय घडलं?

वनराजच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या आयुषच्या वडिलांनी पॅरोलची मागणी केल्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार 72 तासांसाठी पुढे ढकलण्यात आला होता. न्यायालयाने गणेश कोमकरचा एक दिवसाचा पॅरोल मंजूर केला आणि सोमवारी संध्याकाळी 50-60 पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविवारी, सहाय्यक सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी दंडाधिकारी न्यायालयात माहिती दिली की, शस्त्रे शोधण्यासाठी आणि मोठा कट उलगडण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक आहे. न्यायालयाने पाटील आणि पटोले यांना 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    follow whatsapp