Husband Killed Wife Murder Case : 12 वर्षांच्या लग्नाचा खतरनाक शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती दुबईत मजुरी करत होता. जवळपास 8 महिन्यांपूर्वी बिहारच्या समस्तीपूरमध्ये या गावात तो पोहोचला आणि एक दिवस त्याने पत्नीचा गळा कापून खून केला. या आरोपीने हत्येच्या गुन्ह्यापासून स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
ADVERTISEMENT
पती-पत्नीच्या नात्याचा खतरनाक शेवट समस्तीपूरमध्ये झाला. ही धक्कादायक घटना ताजपूर परिसरातील हरीपूर भिंडी गावात घडली. 21 ऑगस्ट रोजी येथे एका महिलेचा गळा कापून खून करण्यात आला. महिलेचा मृतदेह तिच्या घराच्या छतावर सापडला. त्यानंतर कुटुंबातील सर्वच लोकांना मोठा धक्का बसला.
चुलत भावासोबत झाला होता वाद
जमिनीच्या विषयावरून चुलत भाऊ विनोदसोबत उदयचं भांडण झालं होतं. विनोदने उदय आणि त्याची पत्नी रीनासोबत मारहाण केली होती. यामुळेच हत्येच्या घटनेत संशयाची सुई फिरकली. पण विनोदने पोलिसांना अशी माहिती दिली, ज्यामुळे संपूर्ण तपासाची दिशा बदलली.
हे ही वाचा >> वडिलांना 'त्या' एका गोष्टीचा होता लेकीवर राग, नंतर नातीसह लेकीवर कोयत्याने केले सपासप वार...
चुलत सासऱ्याशी होते प्रेमसंबंध
पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली. पती उदयने गुन्हा कबूल करत म्हटलं की, त्यानेच पत्नी रीनाची हत्या केली. त्याला संशय होता की, तिचे चुलत सासऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. जेव्हा तो दुबईत मजुरी करायचा, तेव्हा त्याच्या चुलत भावाने त्याला फोन केलं आणि म्हटलं, माझे वडील आणि तुझ्या पत्नीचे संबंध आहेत. इकडे येऊन परिस्थिती सांभाळ, नाहीतर संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू. त्यानंतर उदय बिहारला आला आणि त्याने पत्नीवर नजर ठेवणं सुरु केलं.
उदयचा पत्नीवरचा संशय वाढत चालला होता. तो जेव्हा पत्नीला याविषयी विचारायचा, तेव्हा ती त्या गोष्टींना नकार द्यायची. पण उदयच्या डोक्यात संशयाची सुई फिरकत होती. 21 ऑगस्ट रोजी तो दारू पिऊन घरी आला आणि पत्नीला झोपेचा बहाणा करून छतावर घेऊन गेला. त्याने पुन्हा पत्नीला विचारलं, पण तिने पहिल्यासारखाच प्रतिसाद दिला. उदयने तिथेच पत्नीसोबत शारीरिक संबंध केले. जेव्हा त्याची पत्नी झोपली, तेव्हा त्याने उशीखाली ठेवलेला चाकू काढला आणि तिच्यावर वार करून खून केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने हत्येचा गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा >> महिलेनं पहिल्या पतीची हत्या केली..आता BF सोबत मिळून दुसऱ्या पतीवर चाकूने वार केले..बाथरूममध्ये मृतदेह सापडला अन्..
ADVERTISEMENT
