Crime news : वडील आणि मुलाच्या नात्यासारखं नातं या जगात कुठेच नाही. पण, याच नात्यात अनेकदा कौटुंबिक कलहातून दुरावा निर्माण होऊ शकतो. अशीच एक दुर्दैवी घटना आता समोर आली आहे. वडिलांनीच आपल्या मुलाचा खून केला आहे. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी वडिलांना कुऱ्हाडीसह बेड्या ठोकल्या आहेत. पत्नी आणि मुलीने जर कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 17 सप्टेंबरपासून बुधादित्य योग निर्माण होणार, काही राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ होईल
कौटुंबिक वादातून वादंग
सोरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहिबीपूर गावातील रहिवासी लालजी यादव हे बहराइच येथे शेतकाम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. रविवारी रात्री त्यांचा मुलगा विनोद कुमार यादव (वय 27) याच्याशी कौटुंबिक वादंग निर्माण झाला. तसेच पत्नी फूलदेवी आणि मुलगी कांचन यांनी आरोपी वडिलांना शांत राहण्यास सांगितलं. तेव्हा त्यांनाही शांत राहण्याची धमकी दिली.
कुऱ्हाडीने गळा चिरून खून
उशीरा रात्री विनोदकुमार यादव हा घरातील एका खोलीत झोपला होता. तेव्हा त्याचे वडील लालजी यादव यांनी त्यांची पत्नी फूल देवी आणि कांचन यांना घरातील एका बंद खोलीत नेलं आणि बंद केलं. त्यानंतर त्यांनी विनोद यांचा कुऱ्हाडीने गळा चिरून खून केला. त्यांची पत्नी आणि मुलीला धमकी दिली की जर त्यांनी कोणाला काही सांगितल्यास त्यांचीही हत्या केली जाईल. शेजाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, दारूच्या नशेत असलेल्या लालजी यादव हा मुलाच्या हत्येनंतर घरात कुऱ्हाड घेऊन फिरत होता.
हे ही वाचा : दहिसरच्या इमारतीला भीषण आग, महिलेचा आगीत होरपळून मृत्यू, जखमींची संख्या आली समोर...
या एकूण घटनेची माहिती पोलिसांनी शेजाऱ्यांना सोमवारी दिली होती. संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक केशव वर्मा यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी वडील लालजी यादव यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेनं घटनास्थळावरील परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
