Crime News : एखादा व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेल्यास तो कोणत्याही पातळीपर्यंत जाण्याची शक्यता असते. व्यसन जर सूटलं नाही,तर व्यसनी माणूस व्यसनासाठी वाटेल ते करतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. तरुणाला दारूचं व्यसन होतं, दारू पिण्यासाठी त्याने आपल्या आईकडे दारु पिण्यासाठी 40 रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर आईने तरुणाला दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने विटेनं हल्ला करत आईची हत्या केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वडिलांना 'त्या' एका गोष्टीचा होता लेकीवर राग, नंतर नातीसह लेकीवर कोयत्याने केले सपावप वार ...
नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरणात पंकी परिसरातील सहाय्यक पोलीस आयुक्त शिखर यांना रविवारी सांगितलं की, शनिवारी पश्चिमपारा ठाणे क्षेत्रातील कासिगवां गावातील राजाराम नावाच्या तरुणाने दारू विकत घेण्यासाठी आपल्या आईकडे राजेश्वरी (वय 80) पैशाची मागणी केली होती. तेव्हा आईनं पैसे देण्यास नकार दिल्यानंतर विटेनं हल्ला केला आणि आपल्याच आईचा जीव घेतला.
पोलिसांनी सांगितलं की, दारुच्या नशेत असलेल्या तरुणाची आई एका घरात दरवाजा बंद करून बसली होती. पण लेकाने दारूसाठी घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर विटेनं हल्ला केला असता, तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांना धाव घेतली असता, घटनास्थळी असलेल्यांना आरोपी मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. आता मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
हे ही वाचा : मुलींच्या वसतिगृहात सुरू होता घाणेरडा खेळ, परराज्यातून महिलांचं सुरू होतं सेक्स रॅकेट, एका झटक्यातच...
घटनेची पुनरावृत्ती
दरम्यान, अशीच आणखी एक घटना उत्तर प्रदेशातील फतेहपुरमध्ये जून महिन्यात घडली होती. आरोपी कमलेश सिंहने (वय 36) नशेत आपलीच आई श्यामकलीला (वय 60) बेदम मारहाण केली. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
ADVERTISEMENT
