Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ही खळबळजनक घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली असून, आरोपींनी केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेकडून जबरदस्तीने पैसेही उकळले. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आसाममधील सिलचरमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : डोंबिवलीत डॉक्टरचे नर्सशी विवाहबाह्य प्रेमसंबंध, 10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न
बॉयफ्रेंडसमोरच तरुणीवर अत्याचार
पीडित तरुणी सिलचर शहरापासून काही अंतरावर असलेल्या बायपास रोडवर आपल्या प्रियकरासोबत कारमध्ये होती. यावेळी एका एसयूव्हीमधून काही अज्ञात व्यक्ती तिथे पोहोचल्या आणि त्यांनी या दोघांवर हल्ला केला. आरोपींनी सुरुवातीला त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर अचानक दोघांनाही पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, सात नराधमांनी बॉयफ्रेंडच्या समोरच तरुणीवर एक-एक करून आळीपाळीने बलात्कार केला.
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले
यानंतर आरोपींनी पीडितेला धमकावून त्यांच्यापैकी एकाच्या बँक खात्यात 10 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पीडितेने यातील दोन आरोपींना ओळखले असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या दोघांना अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपींची ओळख पटवण्याचे आणि त्यांना पकडण्याचे प्रयत्न पोलीस युद्धपातळीवर करत आहेत.
हे ही वाचा : माजी सैनिकाच्या हत्येने साताऱ्यात संतापाची लाट, गावगुंड आरोपी अजूनही फरार असल्याने सैनिकांचा आक्रोष मोर्चा
तृणमूल काँग्रेसच्या खासदाराची मागणी
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा आणि कोणताही दबाव न घेता गुन्हेगारांना शिक्षा मिळायला हवी,' असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT











