बँक मॅनेजर हत्याकांड: भावासाठी करणार होता ‘ती’ गोष्ट, पत्नीने जीवच घेतला!

मुंबई तक

26 Oct 2023 (अपडेटेड: 26 Oct 2023, 12:10 PM)

उत्तर प्रदेशामधील आग्रा येथील बँक मॅनेजरची त्यांच्या पत्नीने हत्या केल्यानंतर आता अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. त्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. भावासाठी पेट्रोल पंप खरेदी करण्याचे नियोजन केले म्हणून पत्नीनेच बँक मॅनेजरला ठार करुन त्यांचा मृतदेह 17 तास घरातील एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आला. त्यानंतर कढी भात आणि 17 चपात्या करुन जेवणाचाही बेत तिने आखला होता.

Bank manager Sachin Upadhyay was going to buy a petrol pump for his brother, so his wife killed him uttar pradesh agra murder case

Bank manager Sachin Upadhyay was going to buy a petrol pump for his brother, so his wife killed him uttar pradesh agra murder case

follow google news

Bank Manager Murder: उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये (Uttar Pradesh Agra) बँक मॅनेजर सचिन उपाध्याय (Sachin Upadhya) यांची हत्याकांडातील आरोपी पत्नी प्रियांका (Priyanka) आणि सासरे बिजेंद्र सिंह रावत अजूनही फरार आहेत. तर प्रियांकाचा भाऊ कृष्णा रावतला पोलिसांनीी अटक करुन त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मात्र आता या हत्याकांडामधील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सचिन उपाध्याय हा आपल्या भावासाठी पेट्रोल पंप (Petrol Pump) खरेदी करण्याच्या तयारीत होता. मात्र ही गोष्ट त्याने आपल्या पत्नीपासून लपवून ठेवली होती.(bank manager sachin upadhyay was going to buy a petrol pump for his brother, so his wife killed him uttar pradesh agra murder case)

हे वाचलं का?

भावावरून पती-पत्नीचा वाद टोकाला

सचिन उपाध्याय आपल्या भावासाठी पेट्रोल पंप खरेदी करतो आहे. हे समजताच प्रियांका आणि सचिन या पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाला होता. सचिनच्या भावाला नोकरी नव्हती, त्यामुळे तो बेकार होता. त्याचमुळे सचिनने आपल्या भावाला पेट्रोल पंप काढून देऊन त्याला त्याच्या आयुष्यात स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्या गोष्टीवरून सचिनची पत्नी प्रियांकाने सचिनबरोबर वाद घालत होती. त्यातच सचिनच्या घरातल्याबरोबरही तिचे काही पटत नव्हते. त्याचमुळे ती बँक मॅनेजर असणाऱ्या नवऱ्याबरोबर वारंवार वाद घालत होती.

शांत डोक्यानं हत्या

पती-पत्नीचा वाद इतका टोकाला गेला की, त्या वादातूनच बँक मॅनेजर असणाऱ्या सचिन उपाध्याय यांची वाईट पद्धतीने हत्या करण्यात आली. सचिनच्या पत्नीने ज्या प्रकारे शांत डोक्याने सचिनची हत्या केली ती साऱ्यांनाच धक्का देणारी होती. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात काही गोष्टींचा उलघडा होतो आहे.

हे ही वाचा >> रोडरोमियोंना अद्दल! पोलिसांनी अशी दिली शिक्षा, मुलींची छेडछाड आली अंगलट

मृतदेह घरात लपवला

आपल्या पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह खोलीत बंद करुन ठेवण्यात आला होता. त्यानंतर प्रियांकाने मोलकरणी आल्यानंतर तिला कढी-भात आणि 16 चपात्याही करायला सांगितल्या होत्या. कारण घरात हत्या झाली याचा कोणालाही संशय येऊ नये यासाठी ती हे नाटक करत होती.

दोघांमधील संवाद काय?

प्रियांका एवढ्यावरच थांबली नाही तर शेजारा राहणाऱ्या कुटुंबाकडचा मोबाईल घेऊन तिने आपल्या वडिलांना फोन केला. जे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्या बिजेंद्र सिंह रावत यांना फोन करुन सांगितले की, सचिन यांची तब्बेत बिघडली आहे. त्यामुळे तुम्ही कृष्णाला पाठवून द्या असंही तिनं वडिलांना सांगितले. त्यामुळे या हत्या प्रकरणात आता बिजेंद्र सिंह रावत हेही सहआरोपी आहेत. त्यामुळे या दोघांना अटक झाल्यानंतरच त्या दोघांमधील नेमका संवाद काय झाला होता हे कळणार आहे.

शवविच्छेदनाचा धक्कादायक अहवाल

पोलिसांनी प्रियांकाला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मात्र ती अजूनही पोलिसांसमोर आली नाही. तिच्या बरोबरच तिचे आई-वडीलही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांना समजले की, सचिन उपाध्याय यांची 21 ऑक्टोबरच्या रात्री हत्या झाली होती. त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाली होती. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांना सचिन उपाध्याय यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती हे स्पष्ट झाले होते.

हे ही वाचा >> Maratha Reservation : एक वाक्य लिहिलं अन् दिला जीव; तरुणाचा मृतदेह बघून…

पुरावेही केले नष्ट

तर सचिनच्या शरीरावर गरम धातूने त्याला भाजल्याच्याही खुणा आहेत. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर 17 तास मृतदेह खोलीत लपवून ठेवण्यात आला होता. त्यानंतर पुरावेही नष्ट करण्यात आले आहेत. पोलिसांनी कॉलनीत चौकशी केल्यानंतर त्यांच्या घरी मुन्नी आणि रजनी नावाच्या दोन मोलकरणी कामाला येत होत्या एवढीच माहिती कॉलनीतील रहिवाशांनी सांगितले होते.

प्रियांकाचे अजब धाडस

सचिन उपाध्याय यांची हत्या करूनही प्रियांकाने मृतदेह लपवून ठेवून तिने मोलकरणीला 16 चपात्याही बनवल्या सांगितल्या होत्या. कारण पाहुणे आल्यानंतर जेवण बनवता येणार नाही म्हणून तिने आधीच जेवणाची व्यवस्था करुन ठेवली होती. त्यामुळे आता पोलिसांनी प्रियांकाबरोबरच या गुन्ह्यात आणि कोणाकोणाचा सहभाग आहे त्याचा तपासही पोलीस करत आहेत.

    follow whatsapp