Crime News : बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केवळ घरगुती गॅस सिलेंडरवरुन झालेल्या वादात एका पतीने आपल्या नऊ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या केली. वीरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुजफरा गावात ही खळबळजनक घटना घडली असून, 21 वर्षीय लक्ष्मी देवी असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी पती राजा चौधरी याला जुगाराचे व्यसन होते आणि याच कारणावरून त्यांच्या घरात वारंवार वाद होत असत. गेल्या दहा दिवसांपासून घरातील गॅस संपल्यामुळे गर्भवती लक्ष्मीला लाकडाच्या चुलीवर जेवण बनवावे लागत होते, ज्याचा तिने मंगळवारी (31 मार्च) रात्री विरोध केला होता.
ADVERTISEMENT
सिलेंडरवरुन वाद
या घटनेबाबत माहिती देताना मृत महिलेच्या वडिलांनी सांगितले की, मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत त्यांचे मुलीशी बोलणे झाले होते, मात्र त्यानंतर अचानक सासूने फोन करून लक्ष्मी पडल्यामुळे दगावल्याचे सांगितले आणि फोन बंद केला. वास्तविक, एलपीजी सिलेंडर आणण्याच्या कारणावरून झालेल्या वादात राजा चौधरीने लक्ष्मीला बेदम मारहाण केली, ज्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लक्ष्मीच्या अडीच वर्षांच्या मुलाच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे. हत्येची माहिती मिळताच बुधवारी (1 एप्रिल) सकाळी माहेरच्या मंडळींनी बेगूसराय सदर रुग्णालयात धाव घेतली आणि संताप व्यक्त करत गोंधळ घातला.
हे ही वाचा : डोंबिवलीत पुजाऱ्याचं विकृत कृत्य, घरात कोणीही नसताना 5 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
राजा चौधरी अटकेत
बेगूसरायचे पोलीस अधीक्षक मनीष यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी पती राजा चौधरी याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. मृतदेहाचे पोस्ट मार्टम करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. दरम्यान, लक्ष्मीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, हा केवळ गॅस सिलेंडरचा वाद नसून हुंड्यासाठी तिचा छळ केला जात होता आणि त्याच रागातून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
हे ही वाचा : चिपळूणमधील आंब्याच्या बागेत जळालेल्या हाडांमागचं भयानक सत्य समोर, काय आहे मुंबई कनेक्शन? जाणून घ्या सविस्तर
लक्ष्मी होती गर्भवती
मंगळवारी रात्री दरभंगा जिल्ह्यातील सोहरबा घाट परिसरात आलेल्या वादळ आणि पावसामुळे लक्ष्मीचे वडील वेळेत पोहोचू शकले नाहीत. बुधवारी सकाळी जेव्हा ते रुग्णालयात पोहोचले, तेव्हा त्यांना आपल्या पोटच्या मुलीचा मृतदेह पाहावा लागला. एका क्षुल्लक कारणावरून आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीच्या कृत्यामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
ADVERTISEMENT











