Crime News : ज्या मॅरेज हॉलवर लग्न किंवा इतर काही समारंभ होणं अपेक्षित असतं त्या ठिकाणी काहीतरी वेगळाच प्रकार सुरु होता. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे या हॉलवर छापा मारला. यावेळी त्यांना हादरवून टाकणारं एक दृश्य दिसलं. तब्बल ८० तरुण आणि तरुणी पोलिसांना आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये 39 महिला आणि 41 पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांना आता न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींचाही मोठा सहभाग असल्याचे समोर आले आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
31 अल्पवयीन मुलं ताब्यात
या कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण 31 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले असून, त्यामध्ये 18 मुली आणि 13 मुलांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलींच्या बाबतीत 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बाल कल्याण समितीच्या संरक्षणाखाली पाठवण्यात आले आहे. तसेच, सज्ञान महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळलेल्या अल्पवयीन मुलांच्या प्रकरणाचीही सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेच्या गांभीर्यामुळे प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
हे ही वाचा : शेतात नेऊन अल्पवयीन मुलीच्या तोंडात फडकं कोंबलं, चौघांकडून सामुहिक बलात्कार, अश्लील व्हिडीओही बनवला
मोठं रॅकेट असण्याची शक्यता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून तपास केला जात आहे. ही घटना केवळ स्थानिक स्वरूपाची नसून, यामागे एखादी मोठी संघटना किंवा रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असू शकते, त्यामुळे बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. 'हे प्रकरण कोणत्याही मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कचा भाग असू शकते, त्यामुळे आम्ही अत्यंत गांभीर्याने तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्यास बांधील आहोत,' असे स्पष्ट मत एसडीपीओ यांनी व्यक्त केले आहे.
हे ही वाचा : पुण्यातील फुरसुंगीत तरुण सराफ व्यवसायिकाने प्रेमसंबंधातून उचललं टोकाचे पाऊल, सुसाईड नोटमध्ये काय?
मुख्य सूत्रधार कोण?
दरम्यान, या लज्जास्पद घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी संताप व्यक्त केला असून या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. आरोपींविरुद्ध लवकरात लवकर आणि कठोर कायदेशीर पावले उचलून न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मॅरेज हॉल आणि सार्वजनिक ठिकाणांवर कडक देखरेख ठेवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पोलीस यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT











