लॉरेन्स बिश्नोई गँगची दहशत पोहचली अंबरनाथपर्यंत, सराफा व्यापाऱ्याला भयंकर धमकी

मिथिलेश गुप्ता

27 Mar 2023 (अपडेटेड: 27 Mar 2023, 10:11 AM)

Lawrence Bishnoi: सिद्धू मुसेवाला हत्याकांडात सहभागी असलेल्या बिश्नोई गँगची दहशत आता महाराष्ट्रातील अंबरनाथपर्यंत पोहचली आहे. कारण येथील एका सोने व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकविण्यात आलं आहे.

Lawrence Bishnoi threatened for extortion to ambernath gold trader

Lawrence Bishnoi threatened for extortion to ambernath gold trader

follow google news

Lawrence Bishnoi Gang: अंबरनाथ: प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्याकांडात सहभागी असलेल्या तसेच अभिनेता सलमान खानला (Salman Khan) ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पंजाबमधील लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गँगकडून खंडणीसाठी अंबरनाथमधील (Ambernath) एका ज्वेलर्स दुकान मालकाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात येणार असल्याची मोबाइलवर धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ज्वेलर्स दुकानाचे मालक परबतसिंग किशोरसिंग चुडवाल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम 385, 506(2), 504, 507 गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (bishnoi gangs terror reaches ambernath threatens bullion trader for extortion)

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार परबतसिंग चुडवाल यांचे अंबरनाथ पूर्वेकडील महालक्ष्मीनगर मध्ये देवभैरव ज्वेलर्स नावाने सोने चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे. त्यातच तक्रारदार परबतसिंग यांना 23 मार्च रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या मोबाइल नंबरवर 6201967489 या व्हॉट्सअप नंबरवरून कस्टमर केअर मधून कॉल आला होता.

अधिक वाचा- नाशिक हादरलं… कंपनीच्या CEO ची भररस्त्यात गाडी अडवून निर्घृण हत्या

कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने लॉरेंस बिश्नोई गँगकडून बोलत असल्याचे यावेळी सांगितले, ‘मी पाठवत असलेल्या बारकोड नंबरवर 20 हजार रुपये पाठव, नाही तर तुझ्या मुलीचे अपहरण करू, अपहरण केल्यानंतर तुला 20 लाख रुपये द्यावे लागतील, तुला तुझे कुटुंबाबाबद्दल प्रेम वाटतं की, पैसा प्यारा आहे? हे आता तूच ठरव.’ असे बोलून त्या अज्ञात व्यक्तीने परबतसिंग यांना अश्लील शिवीगाळही केली. शिवाय जर तू आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तुझी हत्या करून अशीही धमकीही त्याने दिली आहे.

या धमकीमुळे तक्रारदार परबतसिंग हे भयभीत झाले होते. विशेष म्हणजे त्या अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्यानंतर किमान 15 वेळा परबतसिंग यांच्या मोबाइलवर कॉल आले होते. मात्र, भयभीत झाल्याने त्यांनी कॉल रिसिव्ह केले नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सदरचे मोबाइल नंबर व बारकोड सायबर विभागाकडे तपासासाठी पाठवले आहे.

अधिक वाचा- Nashik : चार महिन्यांच्या लेकीचा आईनेच कापला गळा, पोलीस तपासात कळलं कारण

गँगस्टरकडून सलमान खानला देखील जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानला अलीकडेच ई-मेलद्वारे धमकी आली होती. यानंतर त्याच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली होती. पण त्याच्या जवळच्यांच्या म्हणण्यानुसार सलमानला धमक्यांनी काही फरक पडत नाही. त्याला मुक्तपणे आयुष्य जगायला आवडते. 2019 मध्येही त्याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्याच वेळी अलीकडेच त्याच्या मॅनेजरला एक ई-मेल आला, ज्यामध्ये त्याला गँगस्टर गोल्डी ब्रारशी बोलण्यास सांगितले होते.

अधिक वाचा- Crime : प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडलं; मग दोघांनी पतीसोबत केलं असं काही की…

जर सलमान बोलला नाही तर मोठा धक्का दिला जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. मॅनेजरने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.

    follow whatsapp