MBA ग्रॅज्युएट तरुणीचा 'त्या' अवस्थेत मृतदेह! बऱ्याच दिवसांपासून घर बंद अन्...

एका 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या घरात फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरुणी एमबीए ग्रॅज्युएट असल्याची माहिती समोर आलं आहे.

MBA ग्रॅज्युएट तरुणीचा फासावर लटकलेल्या अवस्थेत  मृतदेह!

MBA ग्रॅज्युएट तरुणीचा फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह!

मुंबई तक

• 11:00 AM • 03 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

MBA ग्रॅज्युएट तरुणीचा फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह!

point

बऱ्याच दिवसांपासून बंद घरात नेमकं काय घडलं?

Crime News: एका 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या घरात फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरण हे बंगळुरूच्या गायत्री नगरमधील असल्याची माहिती आहे. घटनेतील मृत तरुणीची ओळख दावणगेरे जिल्ह्यातील रहिवासी असलेली एमबीए ग्रॅज्युएट असल्याची माहिती समोर आलं आहे. संबंधित तरुणी ही बंगळुरूच्या एका खाजगी कंपनीमध्ये कार्यरत होती आणि मागील काही वर्षांपासून ती तिथे एकटीच राहत होती. 

हे वाचलं का?

फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी मुलीच्या कुटुंबियांनी तिच्या घरमालकाशी संपर्क साधला आणि तेव्हा त्यांच्या फोनला उत्तर न मिळाल्याने हे प्रकरण उघडकीस आल्याचं पोलिसांनी सांगितलं. घराचा दरवाजा उघडला असता आतून दुर्गंधी येत होती आणि त्यावेळी, तरुणीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुणीच्या घराचा दरवाजा आतून बंद होता आणि मुलीच्या मृत्यूला तीन ते चार दिवस उलटून गेल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं. 

हे ही वाचा: गिरनारच्या 600 पायऱ्या चढल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका, महाराष्ट्रातील तरुणाचा जागीच मृत्यू; सर्वत्र हळहळ

तरुणीला बाईक राइडिंगची आवड

सब्रमारण्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीला बाईक राइडिंगची खूप आवड होती आणि ती नेहमी तिच्या मित्रांसोबत बाईक राइडवर जायची. अद्याप, तपासादरम्यान घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. 

हे ही वाचा: घटस्फोटानंतर पतीने घरातील मांजरीसाठीही दिली पोटगी, तीन महिन्याला 10 हजार रुपये मोजणार; नेमकं प्रकरण काय?

पोलिसांचा तपास 

पीडित तरुणीचा मोबाईल फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबसाठी पाठवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत्यूपूर्वी पीडिता नेमकं कोणाच्या संपर्कात होती, याचा खुलासा करण्यासाठी डिजिटल डेटाचा वापर केला जाऊ शकतो. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनंतर, तरुणीच्या मृत्यूमागचं नेमकं कारण समोर येणार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात 'अनैसर्गिक मृत्यू' ची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या कुटुंबियांनी अद्याप कोणत्याही संशयितांची ओळख पटवली नाही.

    follow whatsapp