CCTV: निखील कांबळे मागून आला आणि सिद्धारामचा घेतला जीव, कुऱ्हाडीचे वार घालतच बसला.. नेमकं असं घडलं तरी काय?

Murder Case: तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे एका 25 वर्षीय तरुणाने 35 वर्षीय व्यक्तीची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केल्याची घटना घडली आहे.

cctv nikhil kamble came from behind and killed siddaram what if this is exactly what happened in tuljapur

निर्घृण हत्या

मुंबई तक

• 08:20 PM • 01 Nov 2025

follow google news

गणेश जाधव, धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथे आज (1 नोव्हेंबर) सकाळी साडे नऊच्या सुमारास भर चौकात कुऱ्हाडीने हल्ला करून एका व्यक्तीची गावातील तरूणानेच सगळ्यांसमोर निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे केशेगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

मृताचे नाव सिद्धाराम पंडित दहिटणे (वय 35, रा. केशेगाव ता. तुळजापूर) असे असून, आरोपीचे नाव निखिल सोमनाथ कांबळे (वय 25, रा. केशेगाव) असे आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सिद्धाराम दहिटणे हा केशेगाव येथील चावडी चौकातील एका हॉटेलजवळ खुर्चीवर बसून मोबाईल पाहत होते. त्याचवेळी आरोपी निखिल कांबळे हा मोटारसायकलवरून त्या ठिकाणी आला आणि हातातील कुऱ्हाड घेऊन मागून अचानक सिद्धाराम यांच्यावर हल्ला चढविला.

त्याने त्यांच्या मानेवर व शरीरावर सलग सात ते आठ कुऱ्हाडीचे वार करत त्यांना गंभीर जखमी केले. या जबर हल्ल्यात सिद्धाराम दहिटणे हे जागीच मृत्यूमुखी पडले. आरोपी हल्ला करून लगेच मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाला.

पोलिसांची तत्पर कारवाई

घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाणे तसेच इटकळ आऊट पोस्टचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पळून जाणाऱ्या आरोपी निखिल कांबळे याला पोलिसांनी काही अंतरावरूनच ताब्यात घेतले. सध्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

पूर्वीचा वाद कारणीभूत?

या घटनेमागे गावातील मागील भांडणातील वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर येत आहे. तसेच या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. फुटेजमधील दृश्यं अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक असल्याचे सांगितले जात आहे.

    follow whatsapp