Crime news: तुम्हाला जगाच्या इतिहासातील सर्वात खतरनाक सीरिअल किलर विषयी माहितीये का? त्याचं नाव चाइल्ड मर्डरर आणि रेपिस्ट 'पेड्रो लोपेज' असून त्याला 'द मॉन्स्टर ऑफ द एंड्स' असं देखील म्हटलं जायचं. पेड्रो लोपेजने काही वर्षांतच 350 खून केले आणि त्यापैकी बहुतेक 7 ते 12 वर्षे वयोगटातील मुली होत्या. या नराधमाने निष्पाप आणि गरीब मुलींना लक्ष्य केले. तो त्यांना चॉकलेट किंवा इतर खायचे पदार्थ देऊन निर्जन ठिकाणी न्यायचा. मग तो या मुलींसोबत आपली वासना मिटवण्यासाठी घृणास्पद कृत्य करायचा आणि नंतर त्या मुलींची तिथेच हत्या करायचा.
ADVERTISEMENT
सूड घेण्यासाठी भयानक गुन्हे केले
एका मुलाखतीत, या गुन्हेगाराने दर आठवड्याला तीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. रिपोर्ट्सनुसार, पेड्रो लोपेजला 1980 मध्ये 110 जणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती .त्यानंतर त्याने स्वतः 350 लोकांची हत्या केल्याचा मोठा खुलासा केला. मिळालेल्या माहितीनुसार, लोपेजला 1969 मध्ये कार चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आलं होतं आणि तिथूनच त्याने त्याच्या रक्तरंजित गुन्ह्यांना सुरुवात झाली. त्या काळात, तुरुंगात काही इतर गुन्हेगारांनी पेड्रोवर शारीरिक अत्याचार केले. त्याने सूड घेण्यासाठी त्या चौघांनाही ठार मारलं. ही त्याच्या राक्षसी परिवर्तनाची फक्त सुरुवात होती. शिक्षा भोगल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याने बरेच भयानक गुन्हे केले.
हे ही वाचा: चोरी करण्यासाठी कपल कॅफेमध्ये घुसलं, पण आधी शारीरिक संबंध अन् नंतर चोरी... चोरांचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद!
बलात्कार करून मुलींची हत्या करायचा
तो मुलींना अडकवण्यासाठी अतिशय हुशारीने योजना आखायचा. सुरुवातीला, तो रस्ता चुकलेल्या सेल्समनचं नाटक करायचा. नंतर, तो मुलींना आमिष दाखवून त्यांना पळवून न्यायचा. बऱ्याचदा, त्यांना मारण्यापूर्वी तो त्यांचं अपहरण करायचा आणि बलात्कार करून त्यांची हत्या करायचा. हत्येनंतर, तो मृतदेह तिथेच पुरायचा. धक्कादायक बाब म्हणजे, तो मुलींना त्यांच्या गरिबी आणि दुःखातून मुक्त करत आहे, असं त्याला वाटायचं. त्यामुळे मुलींना वाचवत असल्याचा समज बाळगून तो स्वत:ला देव मानायचा.
हे ही वाचा: "एअरगनने त्याने आधी फायर केलं..." रोहित आर्या केससंबंधी मुंबई पोलिसांची माहिती... स्टुडिओच्या आत नेमकं काय घडलं?
पेड्रोवर पुन्हा खुनाचा आरोप
1980 मध्ये त्याला एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी, लोपेजची मानसिक प्रकृती ठिक नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्याला 16 वर्षांसाठी मानसिक रुग्णालयात पाठवण्यात आलं. या सिरीयल किलरची 1998 मध्ये तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर, 2002 मध्ये पेड्रोवर पुन्हा खुनाचा आरोप लावण्यात आला, परंतु त्याला त्यानंतर कधीही अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी त्याचा शोध घेतला, परंतु या सिरीयल किलरला शोधण्यात त्यांना यश आले नाही. तेव्हापासून आजपर्यंत तो सापडलेला नाही.
ADVERTISEMENT











