मेलेल्या आईच्या टाळूवरचा लोणी खाणारा मुलगा, 6 वर्ष राहिला ‘तिच्या’ मृतदेहासोबत अन्…

मुंबई तक

05 Jun 2023 (अपडेटेड: 05 Jun 2023, 02:28 PM)

मारीया यांचे निधन होऊन सुद्धा आरोपी मुलगा (Boy)तिच्या मृतदेहासोबत राहत होता. या दरम्यान शेजाऱ्यांनी आईची विचारणा केली असता, तो त्यांना आई जर्मनीत गेल्याचे सांगायचा.असे साधारण 6 वर्ष त्याने मृत आईला जगासमोर जिवंत असल्याचे दाखवले होते.

boy leaving with dead mother and claim pension for six year got cash money

boy leaving with dead mother and claim pension for six year got cash money

follow google news

Boy leaving dead mother and claim pension : कुटुंबात मुलांचे आईसोबत आणि मुलींच वडिलांसोबत खुप घट्ट नाते असते. हे अनेकदा अनेक कुटुंबियांमध्ये पाहायला मिळते.काही बाबतीत तर हे नाते किती घट्ट असते याची कल्पना देखील तुम्हाला करवता येणार नाही. याआधी अनेक अशा घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये आईसोबत (Mother) असलेल्या घट्ट नात्यामुळे मुलगा तिच्या मृतदेहासोबत अनेक वर्ष राहिल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. आता अशीच घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल 6 वर्ष मुलगा (Boy) आईच्या मृतदेहासोबत राहिला होता. विशेष म्हणजे अशाप्रकारे मृतदेहासोबत तरूणाचे राहण्या मागचे कारण समोर येताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. (boy leaving with dead mother and claim pension for six year got cash money)

हे वाचलं का?

डेली स्टार्स रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी मुलाच्या (Mother) आईचे निधन झाले होते. तिचे नाव मारीया हेंगबर्थ असे होते.मारीया यांचे निधन होऊन सुद्धा आरोपी मुलगा (Boy)तिच्या मृतदेहासोबत राहत होता. या दरम्यान शेजाऱ्यांनी आईची विचारणा केली असता, तो त्यांना आई जर्मनीत गेल्याचे सांगायचा.असे साधारण 6 वर्ष त्याने मृत आईला जगासमोर जिवंत असल्याचे दाखवले होते. त्यामुळे कोणालाही संशय बळावला नाही.दरम्यान या 6 वर्षाच्या काळात आईच्या वाट्याला येणारे 156,000 पाऊंड (म्हणजेच साधारण 1.59 करोड रूपये) मिळवले होते.

हे ही वाचा : विवाहितेचा जंगलात सापडला मृतदेह! रक्तरंजित लव्हस्टोरी मोबाईलने…

असा झाला घटनेचा उलगडा

मे महिन्याच्या सुरुवातीला अग्निशामन दल आणि पोलिसांना आपात्कालीन सर्विससाठी तरूणाच्या इमारतीत जावे लागले होते. यावेळी त्य़ांनी तरूणाच्या घऱात देखील प्रवेश केला होता. तरूणाच्या घरातील पलंगवर एका बॅगमध्ये आईचा मृतदेह ठेवण्यात आला होता. यावेळी आरोपी तरूण घटनास्थळी उपस्थित नव्हता. तरूणाच्या आईने कोरोना वायरसच्या काळात देखील हेल्थ इन्सुरन्स कार्डचा दावा केला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीणच बळावला. यानंतर पोलिसांनी घराची तपासणी करण्यास सुरुवात केली. या तपासणीत तरूणाच्या आईचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. जेणेकरून महिलेच्या मृत्यू कधी झाला आहे, याची माहिती मिळू शकेल.

आईच्या मृत्युनंतर तरूण तिच्या पेन्शनचे पैसे घ्यायचा. आरोपी मुलगा हा वर्षाला साधारण 30 हजार युरो (म्हणजे 26.54 लाख रूपये) घ्यायचा. आईच्या पेन्शनच्या पैशावर जगता यावे यासाठी जगासाठी त्याने आईला जिवंत ठेवले होते. दरम्यान आता आईचा मृतदेह नेमका कसा झाला आहे? आणि आईच्या हक्काची पेंशन तो कसा घ्यायचा,याचा तपास आता पोलिस करत आहे. ही घटना उघडकीत येताच एकच खळबळ माजली आहे.

    follow whatsapp