Chat GPT ला विचारलं आत्महत्या कशी करायची? शेवटी दोन्ही तरुणींचा मृतदेह मंदिराजवळच्या बाथरुममध्ये आढळला

Crime News : मिळालेल्या माहितीनुसार रोशनी आणि ज्योत्स्ना या दोघी दिंडोली येथील रामी पार्क सोसायटीत वास्तव्यास होत्या. त्या दररोज एकत्रच कॉलेजला जात असत. घटनेच्या दिवशी कॉलेजची वेळ संपूनही त्या घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली. पालकांनी त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र दोघींनीही फोन उचलले नाहीत. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रावून मोबाईल लोकेशनचा शोध घेण्यास सुरुवात केली.

Crime News

Crime News

मुंबई तक

09 Mar 2026 (अपडेटेड: 09 Mar 2026, 11:54 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

Chat GPT ला विचारलं आत्महत्या कशी करायची?

point

शेवटी दोन्ही तरुणींचा मृतदेह मंदिराजवळच्या बाथरुममध्ये आढळला

Crime News : दिंडोली परिसरातील स्वामीनारायण मंदिर संकुलातील बाथरूममध्ये दोन तरुण मुलींचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रोशनी शिरसाठ आणि ज्योत्स्ना चौधरी अशी या मृत मुलींची नावे असून त्या एकमेकींच्या बालपणीच्या मैत्रिणी होत्या. या दोन्ही मुलींनी चॅट जीपीटीचा वापर करून आत्महत्येची पद्धत शोधल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून तंत्रज्ञानाचा असा भयानक वापर समोर आल्याने पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार रोशनी आणि ज्योत्स्ना या दोघी दिंडोली येथील रामी पार्क सोसायटीत वास्तव्यास होत्या. त्या दररोज एकत्रच कॉलेजला जात असत. घटनेच्या दिवशी कॉलेजची वेळ संपूनही त्या घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली. पालकांनी त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र दोघींनीही फोन उचलले नाहीत. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रावून मोबाईल लोकेशनचा शोध घेण्यास सुरुवात केली.ॉ

हेही वाचा : विद्यार्थिनीला उचलून घेत मुख्याध्यापकाचा अश्लील गाण्यांवर डान्स, शिक्षक बघत बसले; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

मोबाईल सर्व्हिलन्सच्या मदतीने तपास केला असता दोन्ही मुलींचे लोकेशन सनिया कणदे येथील स्वामीनारायण मंदिर परिसरात दाखवत होते. पोलीस आणि मुलींचे कुटुंबीय तातडीने मंदिर परिसरात पोहोचले तेव्हा तिथे त्यांची मोपेड उभी असलेली आढळली परंतु मुलींचा कुठेच पत्ता लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या दोघी मंदिरातील बाथरूमच्या दिशेने जाताना दिसल्या. बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याने संशय बळावला आणि पोलिसांनी तो तोडला असता दोघींचे मृतदेह तिथे पडलेले होते.

घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना मृतदेहांच्या शेजारी क्लोरोफॉर्मची एक भरलेली आणि एक रिकामी बाटली तसेच इंजेक्शनची सिरिंज सापडली आहे. या दोन्ही मुलींनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून जीवनयात्रा संपवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून घटनास्थळावरून जप्त केलेले साहित्य एफएसएलकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ही घटना गुजरातमधील सूरत शहरात घडलीये. 

सुरतचे एसीपी नीरव सिंह गोहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलींच्या मोबाईलच्या प्राथमिक तपासणीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलींनी आत्महत्येसाठी कोणत्या विषाचा वापर करावा आणि ते कसे घ्यावे याची माहिती चॅट जीपीटीवर शोधली होती. इतकेच नव्हे तर त्यांच्या मोबाईलमध्ये दिंडोली परिसरातील एका अन्य मुलीच्या आत्महत्येची प्रेस नोट देखील सापडली आहे ज्या मुलीने भूल देणारे औषध घेऊन आत्महत्या केली होती. या संपूर्ण घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून या प्रकरणाने पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गौतम गंभीरबाबत MS DHONI ची इन्स्टाग्राम पोस्ट, टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वविजेता बनल्यानंतर काय म्हणाला?

    follow whatsapp