औषध घेण्यास नकार दिल्याने व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाची बेदम मारहाण करून हत्या; धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

Crime News : सुरत मधील डुमास परिसरात 'रीवा व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र' नावाचे एक केंद्र कार्यरत आहे. या केंद्रामध्ये धवल राठोड याला त्याच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र दाखल झाल्याच्या काही दिवसांतच हा दुर्दैवी प्रकार घडला.

Crime News

Crime News

मुंबई तक

09 Mar 2026 (अपडेटेड: 09 Mar 2026, 11:35 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

औषध घेण्यास नकार दिल्याने व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाची बेदम मारहाण करून हत्या

point

धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

Crime News : गुजरातमधील सुरत शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला कर्मचाऱ्यांनी औषध घेण्यास नकार दिला म्हणून इतकी अमानुष मारहाण केली की त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. धवल राठोड असे या 32 वर्षीय मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी व्यसनमुक्ती केंद्रातील चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. रुग्णांना बरे करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी असलेल्या केंद्रातच अशा प्रकारे हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

हे वाचलं का?

सुरत मधील डुमास परिसरात 'रीवा व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र' नावाचे एक केंद्र कार्यरत आहे. या केंद्रामध्ये धवल राठोड याला त्याच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र दाखल झाल्याच्या काही दिवसांतच हा दुर्दैवी प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी धवलने केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिलेले औषध घेण्यास नकार दिला होता. याच कारणावरून केंद्रातील कर्मचारी आणि धवल यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की तेथील कर्मचाऱ्यांनी संयम सोडून धवलला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : विद्यार्थिनीला उचलून घेत मुख्याध्यापकाचा अश्लील गाण्यांवर डान्स, शिक्षक बघत बसले; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

या अमानुष मारहाणीत धवलच्या शरीराच्या अनेक भागांवर गंभीर जखमा झाल्या होत्या. मारहाणीनंतर 1 मार्चच्या रात्री धवलची प्रकृती अचानक खालावली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून केंद्रातील कर्मचाऱ्यांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण केले आणि त्याला तातडीने न्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच धवलचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक भासविण्याचा प्रयत्न झाला असला तरी, डॉक्टरांना धवलच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने संशय बळावला.

पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता डेनियल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात धवलचा मृत्यू हा डोके, कंबर आणि शरीराच्या इतर महत्त्वाच्या भागांवर झालेल्या अंतर्गत आणि बाह्य जखमांमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या अहवालानंतर पोलिसांनी व्यसनमुक्ती केंद्रातील इतर रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली. या चौकशीतून धक्कादायक वास्तव समोर आले की, औषध न घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून कर्मचाऱ्यांनी त्याला क्रूरपणे मारहाण केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून जिग्नेश देसाई, रोहन संघानी, शैलेश वाघेला आणि दिलीप जोशी या चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन समुपदेशक, एक वॉर्ड बॉय आणि एका चालकाचा समावेश आहे. या चौघांवरही हत्येचा आणि इतर कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. व्यसनमुक्ती केंद्रासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचा हिंसाचार होणे ही गंभीर बाब मानली जात असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गौतम गंभीरबाबत MS DHONI ची इन्स्टाग्राम पोस्ट, टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वविजेता बनल्यानंतर काय म्हणाला?

    follow whatsapp