ट्युशनमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण, शिक्षकावर गंभीर आरोप

Crime News : एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंता आणि संतापाचे वातावरण आहे. पीडित मुलीला तिच्याच गावातील एका ट्यूशन शिक्षकाने आपल्या जाळ्यात ओढून हे कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली असून, पोलीस आता आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 08:33 AM • 09 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

ट्युशनमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

point

शिक्षकावर गंभीर आरोप

Crime News : एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंता आणि संतापाचे वातावरण आहे. पीडित मुलीला तिच्याच गावातील एका ट्यूशन शिक्षकाने आपल्या जाळ्यात ओढून हे कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली असून, पोलीस आता आरोपीचा कसून शोध घेत आहेत. बिहारची राजधानी पाटणा येथील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maharashtra Budget 2026 : 75 हजार जागांसाठी पदभरती होणार, फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

विद्यार्थिनीला फूस लावून लैंगिक शोषण

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मनेर परिसरातील एका गावात राहणारी ही अल्पवयीन मुलगी गावातीलच एका शिक्षकाकडे घरगुती शिकवणीसाठी जात असे. आरोप आहे की, शिकवणीदरम्यान शिक्षकाने तिला फूस लावून तिच्यासोबत गैरवर्तन केले आणि तिचे लैंगिक शोषण केले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यानंतर संतप्त कुटुंबीयांनी मनेर पोलीस ठाणे गाठले आणि लेखी तक्रार देऊन नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

आरोपी फरार

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. तपासाला गती देण्यासाठी आणि ठोस पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून काही महत्त्वाचे नमुने गोळा केले आहेत. मनेरचे पोलीस ठाणे प्रमुख रजनीश कुमार यांनी सांगितले की, 'एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीच्या अटकेसाठी विविध ठिकाणी छापेमारी करत आहे.'

हे ही वाचा : अनैतिक संबंध, ब्लॅकमेलिंग आणि पैशांची मागणी! महिला शेतकरी नेत्याच्या हत्येने खळबळ, नेमकं काय घडलं?

पोलिसांनी काय सांगितले?

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाईला अधिक बळकटी मिळेल. तपासादरम्यान सर्व तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांचा विचार केला जात आहे. 'आरोपीला लवकरच अटक करून कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाईल,' असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

    follow whatsapp