Crime News : सावत्र वडिलांनी 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना कोणाला सांगितल्यास आई आणि आठ वर्षांच्या मुलाला मारण्याची धमकी दिली होती. 12 ऑगस्टच्या रात्री आईच्या घरी परतल्यानंतर मुलगी भयभीत झाली होती. ही घटना हरियाणातील पानीपत शहरातील असून घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : महिलेचे पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, सहा वर्षांच्या लेकराला संपवलं
घरात कोणीच नसताना पाहत पीडितेसोबत गैरवर्तन
पीडितेनं रडत रडत आपल्या आत्याला घडलेल्या घटनेची माहिती दिली होती. दरम्यान, मुलीने सांगितलं की, आरोपीने घरात कोणीच नसल्याचं सांगत पीडितेसोबत गैरवर्तन केलं. संबंधित प्रकरणात विरोध होताच मारहाण करण्यात आली आणि कोणाला काही सांगितल्यास हत्या करण्याची धमकी देण्यात आलीय.
पीडितेनं धाडस दाखवत शेजारी राहणाऱ्या एका तरुणाकडून फोन केला. संबंधित प्रकरणात आरोपीच्या गैरकृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आत्याला दाखवण्यात आला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर आईला घटनेची माहिती मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी सावत्र वडिलांना अटक केली.
महिलेनं पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत नमूद केलं की, आरोपीचा पहिला विवाह हा 12 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुले असून नवऱ्यासोबत वादानंतर अहसान नावाच्या व्यक्तीशी विवाह केला होता. दोन वर्षे दोन मुलांसोबत आरोपींसोबत एका भेड्याच्या खोलीत राहत होती.
हे ही वाचा : सूर्यदेव वर्षानंतर आपल्या राशीत जाणार, 'या' राशींचे नशीब पालटणार
दरम्यान, पीडितेच्या नवऱ्याची सहा महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी आरोपींना पकडून बेदम मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीच्या आधारावर तक्रार दाखल करत तपास सुरू ठेवला होता.
ADVERTISEMENT












