महिलेचे पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, सहा वर्षांच्या लेकराला संपवलं

मुंबई तक

Crime News : सहा वर्षाच्या मुलाची आईने आणि तिच्या प्रियकराने मिळून हत्या केली. या प्रकरणात महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली. दोघांनी आपले प्रेमसंबंध लपवून ठेवण्यासाठी आणि समाजात बदनामी होण्याच्या भीतीने लहान बाळाला संपवले. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिलेचे पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध

point

विहिरीत सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह

Crime News : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका सहा वर्षाच्या मुलीच्या आईने आणि तिच्या प्रियकराने मिळून हत्या केली. या प्रकरणात महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली. दोघांनी आपले प्रेमसंबंध लपवून ठेवण्यासाठी आणि समाजात बदनामी होण्याच्या भीतीने लहान बाळाला संपवले. 

हे ही वाचा : सूर्यदेव वर्षानंतर आपल्या राशीत जाणार, 'या' राशींचे नशीब पालटणार

विहिरीत सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह

गावातील एका विहिरीत सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. मुलीचा मृतदेह ओळखण्यासाठी पोलिसांना एक मोठे आव्हान तयार झाले होते. फॉरेन्सिक तपास आणि डायटम टेस्ट रिपोर्टसह न्यायवैद्यक पुराव्याच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तपासादरम्यान, पोलिसांना आरोपीबाबत महत्त्वाचे धागेदोरे सापडले. 

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, दोन्ही आरोपींनी तपास टाळण्यासाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल फोन वापरणे टाळले आणि त्याऐवजी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या मोबाईल फोनवरून एकमेकांशी संपर्क साधला होता. संबंधित प्रकरणात सायबर सेलने तांत्रिक पुरावे, टॉवरची ठिकाणे आणि इतर माहितीचे विश्लेषण करून आरोपीचा शोध घेतला. 

महिलेचे पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध

एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी 15 ऑगस्ट रोजी ग्वाल्हेरमध्ये दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींना गुन्ह्यातील आपली भूमिका केली. संबंधित महिलेनं तिच्या पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध होते.