वहिनीला आवडायचा दीर, पतीला बंद केलं एका खोलीत, नंतर दीरासोबतच... भयंकर कांड

crime news : 24 वर्षीय दीरावर एकतर्फी प्रेमातून त्याच्याच वहिनीने खून केला आहे. नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या.

crime news 

crime news 

मुंबई तक

02 Sep 2025 (अपडेटेड: 02 Sep 2025, 12:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वहिनीनेच भाऊजीला संपवलं

point

धक्कादायक कारण आलं समोर

crime news : देशभरात सध्या अनैतिक संबंधाचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पटनातील फुलवारीशरीफ पोलीस ठाणे परिसरातील भुसौला दानापूर येथे शनिवारी रात्री कौटुंबिक वादातून एका 24 वर्षीय रिझवान कुरैशीची हत्या करण्यात आली. हत्येचा आरोप हा शबनम कुरैशीवर म्हणजेच वहिनीवर लावण्यात आला होता. शबनमने घरात झोपलेल्या आपल्या दीरावर कुऱ्हाडीने वार केला. त्या दीराचं नाव रिझवान कुरैशी असे आहे. वहिनीने दिराची हत्या का केली याचं खरं कारण आता समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

नंतर काय घडलं?

शबनम खोलीच्या बाहेरूनच हाक मारत होती, पण तिला कसलाही प्रतिसाद दिला नाही. तिने लाईट चालू केली असता, रिझवानचा मृतदेह त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला होता. रिझवानचा मृतदेह पाहून तिनं आरडाओरड केल्याचं सांगण्यात येत आहे. 

त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना संबंदित घटनेची माहिती दिली. फुलवारीसचे एसएचओ घटनास्थळी पोहोचले असता एफएसएल पथकालाही बोलावण्यात आले होते. संबंधित तपासादरम्यान, मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. एसएचओने सांगितलं की, या घटनेमागील कौटुंबिक वाद आहे.

कुटुंबियांनी सांगितला सर्व प्रकार 

कुटुंबियांनी सांगितलं की, रिझवानचे एका वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी ही तिच्या माहेरी आहे, आरोपी शबनमला सुरुवातीपासूनच रिझवानसोबत राहायचे होते. लग्नापूर्वी तिने रिझवानसोबत आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.

रिझवानने तिच्यासोबत राहण्यास दिला नकार अन्...

कुटुंबियांचं म्हणणं आहे की, रिझवानने तिच्यासोबत राहण्यास नकार दिला होता, याचा तिला प्रचंड राग होता याच रागातून तिने आपल्या दीराला मारण्यापूर्वी आपल्या पतीला कोंडून ठेवले होते. या घटनेनंतर एकच गोंधळ उढाला. रिझवान हा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. तर आरोपी महिलेचा पती गुरांचा व्यापारी आहे. ते सतत रडत राहिल्याने रिझवानच्या पत्नीची प्रकृती बिघडली आहे.

    follow whatsapp