Crime News : हरियाणाच्या सोनीपत गावात राहणाऱ्या एका महिलेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतात बनवण्यात आलेल्या घरात राहत असलेल्या राजवंती (वय 32) या तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. या हत्येचा आरोप पती नरेशवर लावण्यात आला होता. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : उमरखेड हादरले! वेल्डिंगदरम्यान भीषण स्फोट, दोघांचा करुण अंत
कौटुंबिक नातेसंबंधातून वाद निर्माण
राजवंती आणि तिचा पती नरेश हा मूळचा बिहारच्या मुजफ्फरपूर येथील रहिवासी आहे. दोघेही 11 वर्षीय मुलासोबत रहमाणा येथे शेतकरी राजेंद्रच्या शेतातील घरात राहत होते. नवरा-बायको यांच्यातील कौटुंबिक नातेसंबंधातून त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी सांगितले की, दोघेही दारूच्या नशेत होते आणि काही दिवसांपासून त्यांचात नेहमी वाद व्हायचा.
कौटुंबिक विवादातून पत्नीची हत्या
संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की, नरेश हा दारूच्या नशेत होता. कौटुंबिक विवादातून राजवंतीवर एका हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान महिलेच्या चेहऱ्यावर आणि पोटावर अनेक वार करण्यात आले होते. या गंभीर हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरण हाताळले.
हे ही वाचा : बीड: गणेश विसर्जनादरम्यान तरुणावर चाकूने हल्ला, परिसर हादरला
पोलीस प्रवक्ते रवींद्र कुमार यांनी सांगितलं की, रहमाणातून महिलेच्या हत्येची माहिती समजली. सुरुवातीला तपास केला असता, तपासातून पतीवर हत्येचा आरोप करण्यात आला होता. सुरुवातीला तपासादरम्यान कौटुंबिक वादातून ही हत्या केल्याचा आरोप आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेल्या आधारावर कारवाई केली जाणार आहे.
ADVERTISEMENT












