भिवंडी : 'माझ्या मुलाला फाशी द्या', लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीच्या आईची मागणी

मिथिलेश गुप्ता

• 02:45 PM • 26 Sep 2026

Bhivandi Crime News : भिवंडीत सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या आईने थेट आपल्या मुलाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली. या प्रकरणात पोलीस बडतर्फ पोलीस अधिताकी शैलेश पाटील यांचा शोध घेत आहेत.

Bhivandi Crime News

Bhivandi Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आईचे पोरावर गंभीर आरोप 

point

'मालमत्तेसाठी सतत करायचा छळ'

Bhivandi Crime News : भिवंडीत सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या आईने थेट आपल्या मुलाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली. या प्रकरणात पोलीस बडतर्फ पोलीस अधिताकी शैलेश पाटील यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, शैलेशच्या आई, सुलोचना पाटील यांनी आपल्या मुलावर गंभीर आरोप केलेत. एवढंच नाही,तर शैलेशने त्यांचा संपत्तीवरून शारीरिक आणि मानसिक छळ केला होता. यानंतर आता आरोपीच्या आईनेच मुलाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड: गणेश विसर्जनादरम्यान तरुणावर चाकूने हल्ला, परिसर हादरला

आईचे पोरावर गंभीर आरोप 

संबंधित प्रकरणात आईचा आरोप असाय की, शैलेशने तिच्या डोक्याला पिस्तूल लावून मालमत्ता आणि त्याच्या पत्नीच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता. तिने पुढे सांगितलं की, या प्रकरणी पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. अपेक्षित कारवाई न झाल्याने, तिने न्यायासाठी कोर्टात धाव देखील घेतली होती. सुलोचना पाटील यांच्या आरोपानुसार, मालमत्तेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. 

'मालमत्तेसाठी सतत करायचा छळ'

पुढे सुलोचना पाटील यांनी दावा केला की, त्यांच्या पतीने खरेदी केलेली जमीन आणि इतर संपत्ती शैलेशच्या ताब्यात घेतली. त्यांनी आपल्या मुलावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि रोख रक्कमेचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. त्या आईने सांगितलं की, त्या आता आपल्या मुलासोबत राहत नाहीत, तर मुलीच्या घरात राहत आहेत. त्यांनी पुढे आरोप केला की, त्यांचा मुलगा पैसे आणि मालमत्तेसाठी त्यांचा सतत छळ करत आहे. सुलेचना पाटील यांनी शैलेशवर डान्सबारध्ये खंडणी उकळले आणि धमक्या देणे यांसारख्या कृत्यांचा आरोप केला आहे. 

हे ही वाचा : राणा पाटलांच्या शेजारी का बसले? ट्रोलिंग झाल्यावर ओमराजे रोखठोक

सुलोचना पाटील यांनी आपल्या मुलावर आणखी एक गंभीर आरोप केला की, पीडितेव्यतिरिक्त शैलेश पाटीलने इतर अनेक मुलींसोबत असेच कृत्य केल्याचा दावा केला. याच आधारावर, अशा मुलांना फाशी दिलीच पाहिजे, असा त्यांनी आपल्याच मुलावर आरोप केला आहे. सध्या पोलीस हे शैलेश पाटीलचा शोध घेत आहेत.