'अरे हा पोलिसांना सांगेन', दोन मित्रांनी एकाला चाकूने भोसकून संपवलं, काय घडलं?

मुंबई तक

25 Sep 2026 (अपडेटेड: 25 Sep 2026, 02:55 PM)

Crime News : हैद्राबादमध्ये पोलिसांना ड्रग्जच्या व्यवहाराची माहिती दिल्याच्या संशयातून 30 वर्षीय वसीमची दोन मित्रांनी चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'अरे हा पोलिसांना सांगेन'

point

दोन मित्रांनी एकाला चाकूने भोसकून संपवलं, काय घडलं?

Crime News : हैद्राबादमध्ये पोलिसांना ड्रग्जच्या व्यवहाराची माहिती दिल्याच्या संशयातून एका 30 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. मृत तरुणाची ओळख वसीम उर्फ मोहम्मद नसीरुद्दीन अहमद अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वसीम आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींविरोधात यापूर्वी ड्रग्ज आणि गांजाच्या विक्रीशी संबंधित प्रकरणे दाखल झाली होती. या पार्श्वभूमीवर आरोपींना वसीम पोलिसांसाठी खबऱ्याचे काम करत असल्याचा संशय होता.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!' राज ठाकरेंची सडकून टीका, विरोधकांना आंदोलनाची हाक!

संशयातून वसीम आणि दोन्ही आरोपींमध्ये वाद 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम त्यांच्या ड्रग्जच्या व्यवहाराची माहिती पोलिसांना देत असल्याचा संशय इल्यास आणि शोएब/सोहेल यांना होता. याच संशयातून वसीम आणि दोन्ही आरोपींमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी वसीमवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वसीम गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा : मुलगा दारु पिऊन घरी आला अन् सावत्र आईवर चाकूने सपासप केले वार, 'त्या' रात्री काय घडलं?

वसीमवर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार 

या घटनेनंतर पोलिसांनी इल्यास आणि शोएब/सोहेल यांना संशयित आरोपी म्हणून ओळखले असून त्यांचा शोध सुरू केला आहे. वसीमवर हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वसीम आणि आरोपी यांच्यातील आधीच्या संबंधांसह त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या ड्रग्ज आणि गांजाच्या विक्रीशी संबंधित प्रकरणांचीही माहिती तपासली जात आहे.

दरम्यान, या हत्येचा तपास सुरू असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. त्यासोबतच इतर पुरावेही गोळा केले जात आहेत. वसीमने पोलिसांना आरोपींच्या ड्रग्जच्या व्यवहाराची माहिती दिली होती का, या संशयातूनच ही हत्या करण्यात आली का, याचा तपास पोलिस करत आहेत. इल्यास आणि शोएब/सोहेल यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.