Crime News : कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना आहे. मुलगी इयत्ता 10 वीत शिक्षण घेत होती. पोलिसांनी सांगितले की, आई-वडीलांनी नाच करण्यापासून तिला विरोध केला होता. 22 सप्टेंबर रोजी तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने तिचा मृत्यू झाला. मृत मुलीची जयश्री चालावडी अशी ओळख समोर आली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : नवपंचम राजयोगाची निर्मिती, 'या' राशींचे लोक होणार समृद्ध
जयश्रीच्या आई वडिलांनी नाच गाण्याला केला विरोध
कुटुंबीयांनी तिला पुढे रुग्णालयात देखील नेलं असता, डॉक्टरांनी उपचारादरम्यान रात्री 8.45 वाजता तिला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितलं की, जयश्रीचे आई वडील तिला नाच गाण्याचा विरोध करत होती. यामुळे तिला नैराश्य आलं आणि ती नाराज झाली होती. हे प्रकरण 22 सप्टेंबर रोजी पुजारी 3: 07 वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यादरम्यान जयश्री घरातच होती. कुटुंबीयांना जयश्रीची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली होती.
अल्पवयीन मुलीच्या प्रकृतीत बिघाड अन् मृत्यू
अल्पवयीन मुलीची प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला तात्काळ जयश्रीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला सुरूवातील एका सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला कोप्पल जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले.
हे ही वाचा : मुख्याध्यापक गालाला चुकीचा स्पर्श करायचा, विद्यार्थीनींच्या वॉशरुममध्ये डोकावून पाहायचा..पुढे काय घडलं?
जयश्रीचे वडील लक्ष्मण चालावडी ( वय 38) यांना मुनीराबाद पोलिसांकडे संपर्क साधला. त्यांनी पोलिसांकडे या घटनेची माहिती दिली होती. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं की, जयश्रीच्या मृत्यूवर कोणावरही संशय नाही. पोलिसांनी कुटुंबीयांचे म्हणणे नमूद केले, नंतर या घटनेचा तपास सुरू केला.
ADVERTISEMENT












