बीड: गणेश विसर्जनादरम्यान तरुणावर चाकूने हल्ला, परिसर हादरला

मुंबई तक

• 01:11 PM • 26 Sep 2026

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील कडा येथे गणेश विसर्जनादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणाने जुन्या वादातून चाकूने हल्ला केल्याची घटना आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

Beed crime  (AI Photo)

Beed crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणावर चाकूने हल्ला 

point

अहिल्यानगरातील रुग्णालयात तरुण दाखल 

Beed Crime News : रोहिदास हातागळे - बीड जिल्ह्यातील कडा येथे गणेश विसर्जनादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणाने जुन्या वादातून चाकूने हल्ला केल्याची घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मिरवणुकीनंतर रेहान शेखला बाजू (वय 22) याला बाजूला घेऊन त्याच्यावर चाकूने सपावर वार करण्यात आले. या हल्ल्यात रेहान हा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगरातील रुग्णालयात हलविण्यात आले होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मोठी बातमी : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार 'या' सवलती

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणावर चाकूने हल्ला 

घडलेल्या घटनेनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास रेहान शेख हा मिरवणुकीत सहभागी होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जुन्या वादातून काही जणांनी त्याला बाजूला घेतले होते. नंतर त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अहिल्यानगरातील रुग्णालयात तरुण दाखल 

या हल्ल्यात रेहानच्या छातीसह दंड आणि पोटाच्या भागावर वार झाल्याची माहिती समोर आली होती. नंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, तिची प्रकृती अगदीच चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नंतर त्याला अहिल्यानगरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

हे ही वाचा : राणा पाटलांच्या शेजारी का बसले? ट्रोलिंग झाल्यावर ओमराजे रोखठोक

या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, संबंधित व्यक्तींचा शोध घेतला होता. दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण आणि घटनेतील संबंधितांची भूमिका पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होईल. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान घडलेल्या या घटनेनं कडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी असलेल्या तरुणाचा जबाब नोंदवल्यानंतर सत्यता पडताळून पुढील तपासणी करण्यात येणार आहे.