सहा वर्षाच्या मुलीला संपवलं, नंतर मृतदेह बॅगेत भरून नाल्यात फेकला, हादरवून टाकणारी घटना

Crime News : एका सहा वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत गुंडाळून नाल्यात टाकण्यात आला होता. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

crime news

crime news

मुंबई तक

08 Jan 2026 (अपडेटेड: 08 Jan 2026, 02:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पिशवीत आढळला मुलीचा मृतदेह

point

मृतदेहाच्या मानेला दोरीनं आवळलं

Crime News : बंगळुरुत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सहा वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत गुंडाळून नाल्यात टाकण्यात आला होता. ही घटना बंगळुरु शहरातील पॉश व्हाईटफील्ड या परिसरात घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : चंद्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार, 'या' राशीतील लोकांना मिळणार मोठं यश, फक्त 'हे' करा

पिशवीत आढळला मुलीचा मृतदेह

सोमवारी दुपारी व्हाईटफील्ड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस पथकांनी शोध मोहिम सुरु केली आणि मध्यरात्रीच्या सुमारास नल्लुरहल्ली येथील टेंपल रोडवर मुलीचा मृतदेह आढळल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : इन्स्टाग्रामवर मुलीचा मेसेज येताच कळी खुलली, बोलवताच भेटण्यासाठी गेला पण जीवच गेला!

मृतदेहाच्या मानेला दोरीनं आवळलं

या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचा मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला आणि नंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. तेव्हा मृतदेहाच्या मानेला दोरीने बांधल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार, इतर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाही. गळा दाबून तिची हत्या करण्यात आली असे दिसते. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सक्रिय आहे, असे डीसीपींनी सांगितलं. आरोपीची सध्या ओळख पटली असल्याचं सांगण्यात येत आहे.

    follow whatsapp