Crime News : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लहान मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका अविनाश पांडे (वय 32) नावाच्या तरुणाला अटक केली. पोलिसांनी आरोपीला बलात्कारी असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात बहराइचचे संबंधित पोलीस एसपी राम नयन सिंह म्हणाले की, अविनाश लहान मुलींनी एक चॉकलेट आणि बिस्कीटचे आमिष दाखवून घनदाट झाडांमध्ये घेऊन जायचा आणि लैंगिक शोषण करायचा.
ADVERTISEMENT
हेही वाचा : आई नाही ही कैदासीन, दीड महिन्याच्या पोटच्या लेकराला उकळत्या पाण्यात टाकलं, नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?
पोलिसांकडून पीडित तरुणीचा जबाब
बहराइच एसपी राम नयन सिंह म्हणाले की, "25 जूनपासून, ठाणे सुजौली येथे पाच ते सात वर्षे वयोगटातील मुली रात्री 3 ते 4 वाजता झोपले असताना त्यांचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. अशा एक दोन नाही,तर चार घटना उघडकीस आलेल्या आहेत, ज्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत". ते पुढे म्हणाले की, "मुलींच्या जबाबातून माहिती समोर आली की, आरोपीच्या हातावर टॅटू आहे, त्याचे केस लहान आहेत आणि त्याचे वय वर्षे पंचवीस ते बावीस आहे", अशी माहिती समोर आली. त्यानंतर मुलीने सांगितलं की, "तो दारू पितो आणि त्याच्या कृत्यानंतर तो त्यांना टॉफी आणि बिस्कीटे खायला घालतो. त्याच्या अशा हैवानी कृत्य लक्षात घेत आम्ही त्याचा पाठलाग करत आहोत.
मुलीने सांगितलं आरोपीचे वर्णन
एसपी म्हणाले की, आम्हाला एका सूत्राकडून माहिती मिळाली की, सुजौली येथील अविनाश पांडे या घटनेत सहभागी होते. आमच्या पथकांनी त्याचा पाठलाग सुरू केला आणि त्याला अटक करण्यात आली आहे". एसपींच्या म्हणण्यानुसार, "अटक केल्यानंतर, मुलीनं केलेल्या वर्णनानुसार, आरोपीच्या हातावर एक टॅटूही आढळला. त्याचे केस लहान असून तो सावळ्या रंगाचा आहे. एका मुलीने सांगितलं की, तो दोन मोबाईन फोन वापरायचा आणि त्या फोनद्वारे पॉर्न दाखवायचा. मोबाईल उघडल्यानंतर त्यामध्ये त्या मुलीचे लग्न फोटो देखील आढळले. या आधारावर, पोलिसांनी त्याची कडक चौकशी केली आणि त्यानंतर आरोपीने या घटनेबाबत कबुलीनामा दिला आहे.
हेही वाचा : ज्योतिषशास्त्रात तब्बल 12 वर्षानंतर आला दुर्मिळ योग, 'या' राशीतील लोकांचं नशीब चमकलं
एसपी आपएन सिंह पुढे म्हणाले, "या प्रकरणात आरोपीने केलेलं कृत्य कोणत्याही सामान्य माणसाप्रमाणे नव्हते. त्याच्या मेंदूत केवळ सेक्सुअलिटीचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलेलं होतं. त्याने जाणुनबुजून पाच ते सात वर्षे वयोगटातील मुलींना शिकारी बनवले, जेणेकरून त्या मुली कोणालाही काहीही सांगू शकत नाही.
ADVERTISEMENT
