Crime News : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्हयात बकरी ईद दिवशी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. ईसमुहम्मद अन्सारी नावाच्या एका तरुणाने लोखंडी धारदार शस्त्राने स्वत:चे मुंडकं छाटले आहे. या घटनेमुळे घटनास्थळ आणि भोवतालचा परिसर हादरून गेला आहे. घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली असता घटनेचे गांभीर्य अधिकच संवेदनशील असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : वॉर्ड बॉयनं बाथरुममधून इशारा करत केलं वाईट कृत्य नंतर... महिला रुग्णाने 'त्या' रात्रीचा सांगितला घटनाक्रम
सुसाईड नोटमुळे घटनेचा झाला भांडाफोड
घटनास्थळावरून पोलिसांना सापडलेल्या सुसाईडनोटमध्ये इस्मुहलम्मद अन्सारीने लिहिलं की, माणूस आपल्या लेकरासारखंच बकऱ्याचे पालनपोषण करतो. त्यानंतर ईद दिवशीच आपण त्यांची हत्या करतो. माणूस एक जिवंत प्राणी आहे, त्याचप्रमाणे एखादं जनावर सजीवच असतं, मी अल्लाहच्या दूताच्या नावाने माझा बळी देत आहे. मला कोणीही मारलेलं नाही. माझ्या मृत्यूनंतर आपण माझी कबर एका खुंटीजवळ बनवावी, असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.
मृत तरुणाची पत्नी हजरा खातूनने या कृत्यामागील कारण सांगितलं आहे. ती म्हणाली की, माझ्या पतीला भूत लागले होते आणि तो अनेकदा आझमगडच्या दर्ग्यात जायाचा. हजरा खातूनने सांगितलं की, तो तीन दिवसांआधीच दर्ग्यावरुन परतला होता. शनिवारी इस्मुहम्मद अन्सारी एका ठिकाणी बसून मंत्र बोलत होता. त्यानंतर त्याने लोखंडी धारदार शस्त्राच्या सहाय्याने स्वत:च्या मानेवर सूरा फिरवला. अशावेळी तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. या भयानक घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत संबंधित पीडितेला एका रुग्णालयात नेलं आणि नंतर गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये चांगल्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुन्हा तपास करण्यास सुरूवात केली असता, घटनेची पुष्टी करण्यात आली. घटनास्थळावरुन गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांवरुन आणि जप्त केलेल्या सुसाईड नोटवरुन आत्महत्येचे प्रकरण समोर आलं आहे. घटनेमागील संपूर्ण सत्य उघड करण्यासाठी पोलीस इतर सर्व घटनेचा खोलवर तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : बुधवार पेठेत वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिलेचा रिक्षा चालकाकडून खून, नेमकं घडलं तरी काय?
इस्मुहम्मद अन्सारी यांच्या कुटुंबातील तीन मुले आणि दोन मुली आहेत, त्यापैकी मुलींचा विवाह झालेला होता. ते पूर्वी मजूर म्हणून काम करायचा. तसेच घरी पीठ गिरणीचा जोडधंदा देखील होता. तर त्याचा मोठ्या मुलाचं चिकन सेंटर असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
