Crime News : उत्तर प्रदेशातील शाहजपहांपुर येथील काळीज हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. पत्नी दिसायला काळी असल्याने दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. तर पती अंमली पदार्थांचे सेवन करायचा. यामुळे दोघांमध्ये नेहमी वादाला तोंड फुटायचे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे. संबंधित प्रकरणात आरोपीने पतीचा शोध सुरु केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : महिलेला भुलीचं इंजेक्शन देत रात्रभर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी केलं लैंगिक शोषण, पतीला कळताच...
नेमकं काय घडलं?
ही घटना जलालाबाद पोलीस ठाण्यातील आहे. पतीचे नाव अजय असे असून त्याचा भाजी विक्रीचा जोडधंदा होता, तर तिच्या पत्नीचे नाव प्रिती असे होते. अजयची पत्नी ही दिसायला काळी असल्याने अजयला ती आवडत नव्हती. या क्षुल्लक करणाने दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. याचदरम्यान, पोलिसांनी प्रकरण जाणून घेत तपास केल्यानंतर मोठी माहिती समोर आली.
दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पतीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर पत्नीचा गळा चिरुन खून केला आणि घटनास्थळावरून तो पळून गेला. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच, ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासास सुरुवात केली. दरम्यान, मृतदेह पॉस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अशातच आता पत्नीच्या कुटुंबाने आरोपी पतीला लवकरच अटक करावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा : चोराच्या उलट्या बोंबा! पोलीस असल्याची खोटी ओळख, लंपास केले 2.89 कोटी नंतर...
संबंधित प्रकरणात ग्रामीण पोलीस अधिकारी दीक्षा अरुण म्हणाल्या की, आज दोघांमध्ये नेहमीप्रमाणे वादाला तोंड फुटले. पतीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर पत्नीचा गळा चिरुन खून केला आणि घटनास्थळावरून तो पळून गेला. पोलिसांनी तपास सुरू करत संबंधित प्रकरणाची पुढील कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
