Crime news : पश्चिम बंगालमधील आसनसोलमधील कुल्ती पोलीस ठाणे हद्दीत बाराकर येथील बालटोडिया वॉर्ड क्रमांक 66 परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मामीने तिच्या 7 महिन्यांच्या लहान भाच्याला पाण्यात बु़डवून त्याची हत्या केली. एका पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पाणीपुरीत विष टाकूत गर्भवतीला मारण्याचा कट, नंतर जंगलात नेलं अन्... हादरवून टाकणारी घटना
घडलेल्या घटनेनुसार, मुलगा इस्माईल अन्सारी हा नातू होता. इस्माईल अन्सारीची पत्नी गुलशन आरा, त्यांचा मुलगा शाहनवाज अन्सारीची पत्नी सानिया प्रवीण आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह राहतात. शाहनवाज अन्सारी सध्या बंगळुरूमध्ये काम करतात, तसेच सानियाला 10 महिन्यांची मुलगी देखील आहे.
इस्माईल अन्सारीची मुलगी मुस्कान खातून हिचे लग्न बालटोडिया येथील रहिवासी मुस्ताफा अन्सारीशी झाले होते. मुस्तफा हा बिहारच्या जमुई येथे चालक म्हणून कार्यरत होता. याचदरम्यान मुस्कान आपल्या 7 महिन्यांच्या मुलासह तिच्या पालकांच्या घरी राहत होती.
मामीने 7 महिन्याचा बाळाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आजी-आजोबांनी त्यांच्या नातवावर अधिक प्रेम दाखवले, यामुळे सानिया प्रवीण ही अचानकपणे संतापली, तिने लहान बाळ झोपलेलं असताना त्याला उचलले आणि घरातील पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याचा आरोप केला.
इस्माईल अन्सारी पाण्याच्या टाकीजवळ आल्यानंतर प्रकरण उघडकीस आले
जेव्हा इस्माईल अन्सारी रोजा सोडवण्यासाठी आणि नमजच्या तयारीसाठी पाण्याच्या टाकीजवळ गेला तेव्हा त्याने मुलाला बुडलेलं पाहिले होते. त्याने ताबडतोब मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबाला या प्रकरणाची माहिती दिली होती.
हे ही वाचा : नागपूर : 8 वर्षांच्या लेकीला बाप दाखवायचा पोर्न, नंतर नको तेच... कोणाला सांगितल्यास द्यायचा 'ती' धमकी
संबंधित घटनेची माहिती समजताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरु केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात पाठवला, त्या ठिकाणी शवविच्छेदन सुरु केले. पोलिसांनी सानिया प्रवीण, तिचे आजोबा इस्माईल अन्सारी आणि तिची आजी गुलशन आरा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. शवविच्छेदन अहवाल आणि चौकशीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून तपास सुरु केला.
ADVERTISEMENT











