तोंडातून रक्त अन् शरीरावर जखमा, परिक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थीनीसोबत..

मुंबई तक

17 May 2026 (अपडेटेड: 17 May 2026, 03:40 PM)

Crime News : डीएलडीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थिनीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला होता. याच मृतदेह असलेल्या तरुणीची नीतू गंगावार (वय 23) अशी ओळख समोर आली आहे. ती बरेलीत तिच्या मामाच्या घरी राहत होती. फरिदापूरला परीक्षा देण्यासाठी जात असताना ही घटना घडल्याचं संशय व्यक्त केला जात आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

15 मे दिवशी परीक्षेसाठी विद्यार्थिनी निघाली पण.. 

point

विद्यार्थीनीच्या खूनाचा संशय

Crime News : डीएलडीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थिनीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला होता. याच मृतदेह असलेल्या तरुणीची नीतू गंगावार (वय 23) अशी ओळख समोर आली आहे. ती बरेलीत तिच्या मामाच्या घरी राहत होती. फरिदापूरला परीक्षा देण्यासाठी जात असताना ही घटना घडल्याचं संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनं संबंधित विद्यार्थिनीच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आता चौघांवर हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 14 वर्षीय मुलगी अहिल्यानगरहून मामाकडे निघाली, पण कल्याण रेल्वे स्थानकात बलात्कार

नेमकं प्रकरण काय घडलं? 

हे प्रकरण सीबीगंज पोलीस ठाणे परिसरातील बडा बायपासनजीक, खाना गोटिया गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. शुक्रवारी, महामार्गालगत शेतात विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला होता. शेतात जाणाऱ्या लोकांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर परिसर हादरून गेला. नंतर तात्काळपणे न्यायवैद्यक पथक आणि एसएसपी अनुराग आर्य हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास केला. अशावेळी विद्यार्थिनीच्या तोंडातून रक्त वाहत होते आणि तिच्या शरीरावर जखमा होत्या. प्राथमिक तपासात पीडितेचा गळा दाबून तिची हत्या दिल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

15 मे दिवशी परीक्षेसाठी विद्यार्थिनी निघाली पण.. 

तपासादरम्यान असे उघडकीस आलं की, मृत विद्यार्थिनी ही डीएलएडची विद्यार्थिनी होती. ती बरेलीमध्ये तिच्या मामाकडे राहत होती आणि फरिदपूरला परीक्षा देत होती. 15 मे दिवशी ती परीक्षेसाठी निघाली होती, पण घरी परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, पण तिचा ठावठिकाणा लागणं अवघड होऊन गेलं. कुटुंबीयांच्या म्हणण्यांनुसार, तिचे मामा तिला रोज बरेलीतील सॅटेलाइट बस स्टँडवर दुचाकीवरून सोडवायचा. तिथून ती कारने फरिदपूरच्या परीक्षा केंद्रावर जायची. या वेळीसुद्धा ती परीक्षा द्यायला गेली, पण घरी परतली नाही. 

वडिलांचा चार जणांवर आरोप 

या प्रकरणात मृत मुलीचे वडील सोमपाल गंगावर यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी मुलीच्या हत्येचा आरोप करत चार जणांवर संशय व्यक्त केला. वडिलांचं म्हणणं असं की, एक तरूण लखीमपूरचा रहिवासी आहे, तसेच तिच्या जाण्याने कुटुंब हादरून गेलं आहे. 

मृत मुलीचे काका म्हणजेच मावशीचा पती आणि तिचे वडील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला की, जेव्हा विद्यार्थीनी गायब झाली तेव्हा पोलिसांनी वेळेवर कारवाई केली नाही. कुटुंबीयांना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात पाठण्यात आले, जर पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत तपास केला असता तर मुलगी वाचली असती.  

हे ही वाचा : Astrology : सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार, पुढील काही दिवस 'या' राशींचा तणाव वाढेल

एसएसपी अनुराग आर्य यांनी सांगितलं की, या प्रकरणाची गांभीर्यतेनं तपास केला जात आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून काही वस्तू ताब्यात घेतल्या. परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून विद्यार्थीनी अखेरच्या क्षणी कोणासोबत होती, याचा पोलीस शोध घेऊ लागले आहेत.