इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनीचे अपहरण, गुंगीचे इंजेक्शन देत केला लैंगिक अत्याचार

मुंबई तक

• 05:44 PM • 06 Oct 2026

Crime News : इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आहे. विद्यार्थीनीला अंमली पदार्थाचे इंजेक्शन देखील देण्यात आल्याचा आरोप आहे. पीडितेची प्रकृती अधिक खालावल्याने तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Crime News (AI Photo)

Crime News (AI Photo)

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पीडितेला घरात कोंडून इंजेक्शन देऊन केला लैंगिक अत्याचार 

point

पीडितेची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

Crime News : झारखंडच्या रांची जिल्ह्यातील रातू पोलीस ठाणे परिसरात इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे. विद्यार्थीनीला अंमली पदार्थाचे इंजेक्शन देखील देण्यात आल्याचा आरोप आहे. पीडितेची प्रकृती अधिक खालावल्याने तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात एफआरआय दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चंदनला अटक केली आहे. या घटनेनंतर आरोपीने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : राहुल गांधी बॅरिकेडवर चढले, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात; निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ राडा

पीडितेला घरात कोंडून केला लैंगिक अत्याचार 

एफआरआयनुसार, आरोपीने 29 सप्टेंबर रोजी पीडितेचे तिच्या घरातून अपहरण करण्यात आले. नंतर तो तिला आपल्या घरी घेऊन गेला आणि एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले. जेव्हा तिचे कुटुंबीय तिच्या शोधात आरोपीच्या घरी आले असता, त्याने विद्यार्थीनीला त्यांच्यासोबत पाठवण्यास नकार दिला. तो पीडितेशी विवाह करणार असल्याचे म्हणाला होता. जेव्हा आरोपीची आई आणि बहिणीने चंदनला विद्यार्थीनीच्या कपाळावरील कुंकू लावण्यात सांगितलं, तेव्हा विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आणि जबरदस्ती तिची सुटका करून तिला घरी आणले होते. 

गुंगीचे इंजेक्शन देऊन पीडितेला केलं बेशुद्ध 

घरी गेल्यानंतर पीडित महिला ही बेशुद्ध अवस्थेत होती. तिला तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, एफआरआयनुसार पीडितेच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला, आरोपी चंदनने विद्यार्थीनीला आपल्या घरी बोलावून एका खोलीत ओलीस ठेवले. त्यानंतर त्याने तिला गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध केले होते. पीडिता बेशुद्ध असताना चंदनने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे. 

हे ही वाचा : शिवसेना सुनावणी LIVE : शिंदे गटाकडून चौथ्यांदा युक्तीवाद, काय घडतंय?

या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, जेव्हा विद्यार्थीनी आरोपीच्या घरातून जबरदस्ती सुटका करत होते, तेव्हा चंदन आणि कुटुंबीयांनी त्यांना जीवे मारण्याची अधिकची धमकी दिली. अशातच आरोपीने त्यांनी विद्यार्थीनीला सोबत घेऊन गेल्यास त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.