गेस्ट हाऊसमध्ये दाम्पत्याचा मृत्यू; 20 दिवसांच्या वास्तव्यानंतर धक्कादायक ट्विस्ट

मुंबई तक

• 07:22 AM • 11 Sep 2026

Crime News : लखनौच्या चिनहट परिसरातील गेस्ट हाऊसमध्ये अमित कुमार आणि नर्गिस उर्फ पूजा मृतावस्थेत आढळले. चौकशीत तरुणीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले, तर खोलीत विवाह प्रमाणपत्र आणि चिठ्ठीही सापडली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गेस्ट हाऊसमध्ये दाम्पत्याचा मृत्यू;

point

20 दिवसांच्या वास्तव्यानंतर धक्कादायक ट्विस्ट

Crime News : लखनौच्या चिनहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेड बिल्डिंग गेस्ट हाऊसमध्ये एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी ही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये 22 वर्षीय अमित कुमार आणि 19 वर्षीय नर्गिस उर्फ पूजा यांचा समावेश आहे. दोघेही या गेस्ट हाऊसमधील खोली क्रमांक 101 मध्ये जवळपास 20 दिवसांपासून राहत होते. गेस्ट हाऊसचे संचालक राकेश यादव यांनी पोलिसांना फोन करून खोलीत तरुण आणि तरुणीने गळफास घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?

पंख्याच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित आणि नर्गिस यांनी छतावरील पंख्याच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. पोलिसांनी दोघांचे मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी लोहिया रुग्णालयात पाठवले. गेस्ट हाऊसच्या नोंदीनुसार, अमित आणि नर्गिस 23 ऑगस्टपासून खोली क्रमांक 101 मध्ये राहत होते. पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यावेळी हरदोई येथील हरपालपूर पोलीस ठाण्यात नर्गिसविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतरपासून दोघांबाबत कुटुंबीयांना कोणतीही माहिती मिळाली नव्हती.

हेही वाचा : धाराशिव : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली, जोरदार घोषणाबाजी

विवाह प्रमाणपत्रही पोलिसांना सापडले

या प्रकरणाच्या तपासादरम्यान गेस्ट हाऊसच्या खोलीत आर्य समाज मंदिराचे विवाह प्रमाणपत्रही पोलिसांना सापडले. या प्रमाणपत्रात अमित आणि नर्गिस यांनी विवाह केल्याचे नमूद आहे. त्यामध्ये तरुणीचे नाव नर्गिस उर्फ पूजा असे लिहिलेले आहे. याशिवाय पोलिसांना खोलीत एक चिठ्ठीही सापडली आहे. दोघांच्या मृत्यूमागची परिस्थिती आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरील सर्व पुरावे फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पथकाने जमा केले आहेत.

पोलीस अधिकारी दीक्षा शर्मा यांनी सांगितले की, 9 सप्टेंबरच्या रात्री चिनहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेस्ट हाऊसमध्ये तरुण आणि तरुणीचा आत्महत्येमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांचे मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात पाठवले. रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून विवाह प्रमाणपत्र आणि चिठ्ठी ताब्यात घेतली असून, या प्रकरणातील परिस्थितीचा तपास सुरू आहे.