Crime News : मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यातील सीधी पोलीस ठाणे क्षेत्रातील छत्ता गावात जादूटोणा केल्याच्या संशयातून थोरल्या जावेनं धाकट्या जावेला संपवलं. पोलिसांनी या प्रकरणात मृत महिलेची थोरली जाव मुन्नी बाईला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासातून समोर आले की, आरोपीला संशय होता की, मृत महिला घरी जादूटोणा करत होती, ज्यामुळे तिच्या मुलीचे आरोग्य बिघडले होते, याच मुद्द्यावरून दोघींमध्ये यापूर्वी वाद झाला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ बनवून धमकावलं
थोरली जाऊ मुन्नी बाईने धाकल्या जावेचा स्कार्फने गळा दाबला
घडलेल्या घटनेच्या माहितीनुसार, हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला होता. मृत सुखर्निया सिंह गोंड आपल्या घराशेजारी जनावरे चारण्यासाठी त्यांची जाऊबाई मुन्नी बाई तिथे पोहोचल्या. घडलेल्या घटनेनुसार, दोघींमध्ये एका क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला होता. संबंधित प्रकरणात असा आरोप केला, वादादरम्यान मुन्नी बाईने सुखर्नियाचा आपल्या स्कार्फने गळा दाबला होता. ज्यात त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली आणि गावकरी घटनास्थळी दाखल झाले होते.
संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिधी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याचदरम्यान त्यांनी घटनास्थळावरील लोकांची चौकशी देखील केली होती. पोलिसांनी आरोपी मुन्नी बाईला आपल्या ताब्यात घेत तिची पुढील चौकशी केली. या हत्येमागील मूळ हेतू आणि संपूर्ण घडलेल्या घटनेचा घटनाक्रम पोलीस करत आहेत.
जाऊ मुन्नीबाईला सुखर्निया जादूटोणा करत असल्याचा संशय
पोलिसांच्या माहितीनुसार, जाऊ मुन्नीबाई ही सतत आजारी पडायची. सुखर्निया घरी जादूटोणा करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर मुन्नबाईची प्रकृती बिघडून गेली होती. याच संशयामुळे दोघींमधील सतत वाद सुरू होता. या हत्येमागील कारण म्हणून पोलीस सध्या वादाचा तपास करत आहेत.
हे ही वाचा : बाप - लेकीच्या नात्याला काळिमा, अल्पवयीन लेकीवर बापाकडून लैंगिक अत्याचार, जन्मठेपेची शिक्षा
या प्रकरणी पोलिसांना जादूटोणा प्रकरणावरून महिलेची हत्या केल्याचा संशय आला. संबंधित प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला असू आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला असून महिलेला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT












