ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ बनवून धमकावलं

मुंबई तक

• 02:31 PM • 09 Sep 2026

Crime News : एका रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये महिला पारिचारिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाचे संचालक आणि त्याच्या भाच्याने मिळून हे हैवानी कृत्य केल्याची दुर्दैवी घटना आहे.

अल्पवयीन मुलीचं 7 वर्षे सामूहिक लैंगिक शोषण

अल्पवयीन मुलीचं 7 वर्षे सामूहिक लैंगिक शोषण

Google CTA

बातम्या हायलाइट

point

रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये महिला पारिचारिकेवर लैंगिक अत्याचार

point

पीडितेवर लैंगिक अत्याचारानंतर फोटो आणि व्हिडिओ बनवला

Crime News : एका रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये महिला पारिचारिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाचे संचालक आणि त्याच्या भाच्याने मिळून हे हैवानी कृत्य केल्याची दुर्दैवी घटना आहे. नंतर याचे फोटो आणि व्हिडिओ बनवले होते. नंतर पीडितेनं दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूरच्या घाटमपुर येथे या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बाप - लेकीच्या नात्याला काळिमा, अल्पवयीन लेकीवर बापाकडून लैंगिक अत्याचार, जन्मठेपेची शिक्षा

ऑपरेशन थिएटरमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार 

10 जुलै 2026 पासून संबंधित महिला ही रुग्णालयात पारिचारिका म्हणून कार्यरत होती. या प्रकरणात आरोप करण्यात आला की, रुग्णालयाचे संचालक रेउना ठाणे क्षेत्रातील रहटी गावातील रहिवासी आणि तिचा भाचा तिच्यासोबत अश्लील कृत्य करत होता. या प्रकरणात पीडितेनं विरोध केला असता, तिला कामावरून काढण्याची धमकी दिल्याचा आरोप केला.

पीडितेवर लैंगिक अत्याचारानंतर फोटो आणि व्हिडिओ बनवला

पीडितेनं गरीबीमुळे हा त्रास सहन केल्या. 16 ऑगस्ट रोजी संचालकाच्या भाच्याने तातडीच्या प्रसूतीचे कारण देत भाचा तिला गाडीतून न्यायला आला. तिला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी एका रेस्टॉरंटवर नेत जेवण करण्याचे कारण सांगितलं. तो तिला हॉटेलच्या खोलीत गेला आणि तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली होती, त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने तिचे फोटो काढले आणि व्हिडिओ देखील बनवला होता. या घटनेची माहिती समजल्यासा भावाला ठार करण्याची धमकी दिली. 

हे ही वाचा : Astrology : सप्टेंबरच्या 'या' तारखेपासून काही राशींचे नशीब फळफळणार

या घटनेनंतर दोघांनी मिळून रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये लैंगिक अत्याचार केला होता. 31 ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या ऑपरेटरने तिला एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे. पीडिता या त्रासाला कंटाळून आपल्या माहेरी गेली होती, नंतर कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पीडितेच्या पतीने आरोपी भाच्याला बोलावले असता, आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची घटना आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई सुरू करण्यात आली.