लेकीचा तरुणासोबत नको तो व्हिडीओ व्हायरल, बापाने हातोड्याने वार करत संपवलं

मुंबई तक

• 10:59 AM • 09 Sep 2026

लेकीचा एका तरुणासोबत व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाप चांगलाच चिडला. त्याने आपल्या लेकासोबत मिळून एक प्लॅन बनवला आणि आपल्या लेकीला संपवलं. अहमदाबादमधील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घ्या सविस्तर..

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लेकीचा तरुणासोबत नको तो व्हिडीओ व्हायरल

point

बापाने हातोड्याने वार करत संपवलं

Crime News : अहमदाबादमध्ये एका बावीस वर्षीय तरुणीची तिच्याच वडील आणि भावाने हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्येनंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी या घटनेचा बनाव एका अपघातासारखा रचला होता. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत तरुणीचे वडील मोहम्मद फारुख आणि भाऊ मोहम्मद हाबिल या दोघांनाही अटक केली आहे. 12 ऑगस्टच्या रात्री सोफिया नावाची ही तरुणी तिच्या भावासोबत दुचाकीवरून जात असताना तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद 'हिट अँड रन' म्हणून करण्यात आली होती.

हे वाचलं का?

अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय सोफिया ही एका रुग्णालयात काम करत होती. 12 ऑगस्टच्या रात्री हाबिल तिला दुचाकीवरून घेऊन जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली असल्याचा दावा त्याने केला होता. या कथित अपघातात सोफियाचा मृत्यू झाला, तर हाबिल जखमी झाल्याचे सांगण्यात आले. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि एम डिव्हिजन पोलिसांनी याला अपघात मानून पुढील चौकशी हाती घेतली. मात्र, तपासादरम्यान हाबिलच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या. ज्या ठिकाणी अपघात झाल्याचा दावा त्याने केला होता, तिथे अपघाताचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत आणि सीसीटीव्ही फुटेजमध्येही दुसरे कोणतेही वाहन त्या ठिकाणी दिसले नाही.

हे ही वाचा : MPSC Protest Pune : पेपरफुटीच्या तपासात काय सापडलं? पुण्यातील मोर्चाची स्टोरी

अखेर बाहेर आलं प्रकरण

या संशयास्पद पुराव्यांमुळे पोलिसांनी हाबिलची कसून चौकशी केली, ज्यामध्ये त्याने वडील फारुख यांच्यासोबत मिळून बहिणीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. सोफियाचा एका तरुणासोबतचा व्हिडिओ काही काळापूर्वी व्हायरल झाला होता, ज्यामुळे समाजात बदनामी होईल अशी भीती या कुटुंबाला वाटत होती. त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिचे दुसऱ्या कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचा त्यांना संशय होता. या रागातूनच बाप-लेकाने तब्बल तीन महिन्यांपूर्वीच तिच्या हत्येचा कट रचला होता. त्यांनी 12 ऑगस्टची पावसाळी रात्र निवडली आणि सोफिया ज्या मार्गाने कामावरून येते, त्या अंधाऱ्या आणि कमी सीसीटीव्ही असलेल्या रस्त्याची निवड केली.

हे ही वाचा : बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं, शुगर डॅडीलाही संपवण्याची धमकी

मरेपर्यंत हातोड्याने केले वार

ठरलेल्या कटानुसार, हाबिल आणि फारुख दुचाकीवरून सोफियाच्या रुग्णालयात गेले आणि परत येताना तिला सोबत घेतले. वाटेत हाबिलने स्वतःजवळ लपवलेल्या हातोड्याने सोफियाच्या डोक्यावर जोरदार वार केला. ती बेशुद्ध पडल्यानंतर तिला दुचाकीवरून खाली पाडण्यात आले आणि ती मरेपर्यंत तिच्या डोक्यावर आणखी दोन वार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि अपघाताचा बनाव रचण्यासाठी हाबिलने स्वतःला मुद्दाम जखमी करून दुचाकीचेही नुकसान केले. जवळपास महिनाभर चाललेल्या तपासानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला, त्यानंतर एम डिव्हिजन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना गजाआड केले.