बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं, शुगर डॅडीलाही संपवण्याची धमकी

मुंबई तक

• 09:40 AM • 09 Sep 2026

आसाममधील एका नवऱ्याने बायकोची क्रूरपणे हत्या केली. तिचे शीर कापून फ्रीजमध्ये ठेवले. ही हत्या केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे आरोपीने म्हटले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं

point

शुगर डॅडीलाही संपवण्याची धमकी

Crime News : गुवाहाटी येथील हातीगाव भागात एका पतीने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करून आत्मसमर्पण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रामानूज गोस्वामी असे आरोपीचे नाव असून, त्याने आपली पत्नी रिया तालुकदार गोस्वामी हिची हत्या केली. हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून रियाचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांच्या तपासात तिच्या शरीराचे भाग कापून फ्रीजमध्ये ठेवल्याचे समोर आले असून, हे कृत्य करताना वापरलेला धारदार कोयता आणि रक्ताचे डाग पोलिसांना घरात आढळून आले आहेत.

हे वाचलं का?

फ्रीजमध्ये कापून ठेवले शीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याचा विवाह सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. गेल्या काही दिवसांपासून कुटुंबियांचे फोन उचलणे बंद केल्यामुळे संशय आल्यावर पोलिसांनी त्यांच्या हातीगाव येथील राहत्या घरी जाऊन पाहणी केली. तेव्हा रियाचा मृतदेह आणि प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवलेले तिचे कापलेले शीर आढळून आले. प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या मृतदेह मिळण्याच्या 24 ते 48 तास आधी झाली असावी.

हे ही वाचा : फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा बळी घेतला, आपण बदला नक्की घेऊ; जरांगेंचं थेट आव्हान

'शुगर डॅडीचीही हत्या करेन'

हत्या केल्यानंतर आरोपी रामानूज गोस्वामी याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिस कोठडीत घेऊन जात असताना त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये उबर चालक असलेल्या रामानूजने मला या हत्येचा "कोणताही पश्चात्ताप किंवा खेद नाही" असे थेट सांगितले. तसेच, भविष्यात जर मी तुरुंगातून बाहेर आलो, तर पत्नीच्या 'शुगर डॅडी'चीही हत्या करेन, अशी उघड धमकी त्याने दिली आहे.

हे ही वाचा : वेदर रिपोर्ट : 72 तास, कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार, पाऊस कुठले भाग झोडपणार?

एचआयव्हीचा संसर्ग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असत आणि अशाच एका वादातून रामानूजने हे भयानक पाऊल उचलले. दरम्यान, हत्येच्या वेळी आरोपी अमली पदार्थांच्या प्रभावाखाली होता का, याचाही तपास पोलिस करत आहेत. वैद्यकीय तपासणीत आरोपीला एचआयव्ही (HIV) आणि हिपॅटायटिस सी (Hepatitis C) चा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले असून, तो यापूर्वी 20 पेक्षा जास्त वेळा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला होता.