Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही संतापजनक घटना मंगळवारी (1 सप्टेंबर) संध्याकाळी घडली असून आरोपींनी कट रचून महिलेला जाळ्यात ओढले होते. ओडिशातील जाजपूरमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
दारु पिऊन सामूहिक अत्याचार
आरोपींपैकी एक जण पीडित महिलेच्या ओळखीचा होता. त्याने महिलेला फोन करून तिच्या पतीची प्रकृती अचानक बिघडल्याची खोटी बातमी दिली. पती आजारी असल्याचे ऐकून घाबरलेली महिला संध्याकाळी सुमारे सात वाजता बसने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली. तेथून आरोपी तिला एका निर्जन बंगल्यात घेऊन गेला आणि थोड्याच वेळात त्याचा एक मित्रही तिथे आला. त्यानंतर दोघांनी दारू पिऊन नशेत या महिलेवर सामूहिक अत्याचार केला.
हे ही वाचा : चलाख सूनेनेच रडून फसवलं! चाकूचे 26 वार, सासऱ्याची निघृण हत्या
आरोपींना न्यायालयीन कोठडी
घटनेनंतर पीडित महिलेला उपचारासाठी समुदाय आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, पोलिसांच्या पथकाने जाजपूर परिसरातील छापे मारून दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या क्रूर कृत्याबद्दल आरोपींना कठोर कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
हे ही वाचा : MPSC Protest Pune : पेपरफुटीच्या तपासात काय सापडलं? पुण्यातील मोर्चाची स्टोरी
विश्वासघात अन् कठोर शासन
विश्वास ठेऊन ती महिला आपल्या पतीच्या तब्बेतीच्या काळजीपोटी गेली होती. मात्र तिला कल्पनाही नव्हती की पुढं तिच्यासोबत काय घडणार आहे. या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.
ADVERTISEMENT












