बाप - लेकीच्या नात्याला काळिमा, अल्पवयीन लेकीवर बापाकडून लैंगिक अत्याचार, जन्मठेपेची शिक्षा

मुंबई तक

• 01:12 PM • 09 Sep 2026

Crime News : बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बापानेच आपल्या अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे.

Crime News (AI Photo)

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा

point

बापानेच लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना

Crime News : बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बापानेच आपल्या अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याची मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी बापावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील सीतापुर येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त समोर आले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : सप्टेंबरच्या 'या' तारखेपासून काही राशींचे नशीब फळफळणार

 बापानेच लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना

आरोपी वडिलांनी माटोले अशी ओळख समोर आली. त्याने आपल्या मुलीला राजस्थानात तिच्या आईकडे घेऊन जाण्याच्या बहाण्याने बहिणीच्या घरातून उचलून नेले होते. नंतर तो तिला जंगलात घेऊन गेला आणि तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनं पीडितेच्या आईच्या पायाखालची वाळू सरकली. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आई त्याच दिवशी पोलीस ठाण्यात गेली होती, तिने आपल्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 

गुन्हा दाखल केल्यानंतर, कमलापूर पोलीस ठाणे प्रभारी इतुल चौधरी यांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करून घेतली. घटनास्थळी पडलेली वडिलांच्या शर्टची बटणे तुटलेली होती. केसांसहित पीडितेचे कपडे हे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले होते. अहवाल आणि वैद्यकीय पुरावे गोळा केल्यानंतर गुन्ह्याची पुष्टी करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा : नवरा छळायचा, तरुणाकडून मिळालं प्रेम; हादरवून टाकणारा शेवट

आरोपी बापाला 20 हजार रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा

दरम्यान, पॉक्सो कायद्याचे विशेष न्यायाधीश अवनीश कुमार यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू होती. फिर्याद करणाऱ्या पक्षाने जोरदार व्यक्तीवाद करत पीडितेसह साक्षीदारांचे देखील जबाब नोंदवण्यात आले अशी माहिती आहे. तसेच न्याय‍धीशांनी आरोपी वडिलांना जन्मठेपेची शिक्षा आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला.