विवाहित प्रेयसीने घरी बोलावताच तरुणाची कळी खुलली, भेटायला गेला पण कुटुंबियांनी रंगहात पकडलं

मुंबई तक

10 Sep 2026 (अपडेटेड: 10 Sep 2026, 04:38 PM)

Crime News : विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला तिच्या कुटुंबीयांनी पकडून 30 तास ओलीस ठेवल्याचा आरोप. तरुणाला सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांशीही मारहाण आणि गैरवर्तन केल्याचे प्रकरण.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

विवाहित प्रेयसीने घरी बोलावताच तरुणाची कळी खुलली,

point

भेटायला गेला पण कुटुंबियांनी रंगहात पकडलं

Crime News : विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला तिच्या पतीसह कुटुंबीयांनी पकडून तब्बल 30 तास घरात ओलीस ठेवल्याचा आरोप आहे. तरुणाला सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय. उत्तर प्रदेशातील कानपूरच्या साढ़ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. 

हे वाचलं का?

हेही वाचा : जास्तीच्या सुट्ट्या पाहिजेत, मग थेट वर्गमित्राच्या हत्येचा कट रचला, पण काय घडलं?

प्रेयसीला भेटायला आलेल्या अरुणला कुटुंबियांनी पकडलं 

या परिसरात राहणाऱ्या सुनीता हिचे इंद्रेशसोबत लग्न झाले असून त्यांना तीन मुले आहेत. मागील सुमारे एक वर्षापासून सुनीताचे फतेहपूर येथील अरुण नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. रविवारी रात्री सुनीताने अरुणला फोन करून गावाबाहेर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार अरुण फतेहपूरहून सुनीताला भेटण्यासाठी आला. सुनीताही त्याला भेटण्यासाठी गावाबाहेर पोहोचली होती. मात्र, सुनीताचा पती इंद्रेश याला संशय आल्याने तो कुटुंबातील इतर सदस्यांसोबत तिचा पाठलाग करत घटनास्थळी पोहोचला. यानंतर त्यांनी अरुणला पकडले आणि साढ़ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छांजा गावातील घरात नेले.

हेही वाचा : 'ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांनी माझ्यासोबत...' मामा अन् भाच्याने नर्सवर केला सामूहिक बलात्कार

पोलिसांनाही मारहाण केल्याचा आरोप 

आरोपानुसार, अरुणला घरात नेल्यानंतर त्याच्यासोबत मारहाण करण्यात आली आणि त्याला ओलीस ठेवण्यात आले. अरुणला पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनीताने कशीतरी तिथून बाहेर पडून अरुणच्या वडिलांना याबाबत सांगितले. अरुणच्या वडिलांनी सुनीताला सोबत घेऊन साढ़ पोलीस ठाणे गाठले आणि मुलाला सोडवण्याची मागणी केली. अरुणला 30 तासांहून अधिक काळ सुनीताच्या घरात ओलीस  ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आशीष सिंह हे पोलीस पथक आणि अरुणच्या वडिलांसोबत गावात पोहोचले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुनीताचा पती इंद्रेश आणि घरातील इतर लोकांनी पोलिसांशी गैरवर्तन केले. आशीष सिंह यांच्यासोबत मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या गणवेशावरील बिल्लेही ओढून काढण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर अतिरिक्त पोलीस पथक गावात पोहोचले आणि पोलिसांनी अरुणची सुटका करून त्याला पोलीस ठाण्यात आणले. अरुणला कथितपणे 30 तास ओलीस ठेवण्यात आल्याच्या आरोपाचीही चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पहिला गुन्हा पोलीस उपनिरीक्षक आशीष सिंह यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला असून त्यात पोलिसांसोबत मारहाण आणि गैरवर्तन केल्याचे आरोप आहेत. तर दुसरा गुन्हा अरुणच्या वडिलांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. यात सुनीताचा पती इंद्रेश आणि त्याच्या कुटुंबीयांवर अरुणला ओलीस ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुनीतानेही अरुणसोबत प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले आहे. सुनीताने सांगितले की, तिचे अरुणसोबत एक वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि रविवारी रात्री तिने त्याला भेटण्यासाठी फोन करून बोलावले होते. त्यावेळी घरातील लोक पोहोचले आणि अरुणला पकडून नेले. त्याच्यासोबत मारहाणही करण्यात आल्याचे तिने सांगितले. एसीपी कृष्ण कुमार यादव यांनीही महिलेचे फतेहपूरच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.