गायीवर नराधमाकडून अत्याचार, मालकाने रंगेहाथ पकडताच पळाला

मुंबई तक

• 05:39 PM • 12 Sep 2026

Crime News : गायीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेच्या व्हिडिओप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची देखील ओळख पटली आहे.

Crime News (AI Photo)

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपी गायीसोबत आक्षेपार्ह स्थितीत

point

नागपूरमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला

Crime News : गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात गायीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेच्या व्हिडिओप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची ओळख कानूभाई गोंदलिया अशी पटली आहे. या घटनेनं राजकोट जिल्ह्या हादरून गेला आहे. या प्रकरणी एका स्थानिक रहिवाशाने आरोपीला गायीसोबत रंगेहाथ पकडल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : विद्यार्थीनी शाळेत जाताना नराधम करायचा पाठलाग, पीडितेनं कंटाळून संपवलं जीवन

आरोपी जनावरासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळला

या घटनेदरम्यान चावडा हा आपल्या गायीचा शोध घेताना, ते एका स्मशानभूमीजवळ गेले होते. तिथे त्यांनी गोंदलियाला त्या जनावरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. गुरांच्या मालकाला पाहताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी माहिती दिली, घटनास्थळी उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका स्थानिर रहिनाशाने ही घटना त्याच्या मोबाइल फोनवरून रेकॉर्ड केली होती. 

नंतर, चावडा यांनी पोलिसांशी संपर्क साधून प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गोंदियाला ताब्यात घेण्यापूर्वी, प्राण्याच्या क्रूरतेबाबत प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 11 (1) अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दखल केला होता. दरम्यान, गायीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या अनेक घटना आहेत. यापूर्वी देखील काही लोकांनी गायीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना आहेत. 

हे ही वाचा : वाशिम: कुख्यात गुंडाचा विहिरीत आढळला मृतदेह, 15 हून अधिक गुन्हे दाखल

नागपूरमध्ये असाच धक्कादायक प्रकार 

नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाणे परिसरातील एका खुल्या मैदानात गायीवर अत्याचार करण्यात आला होता. आरोपीची दीपक समुद्रे अशी ओळख समोर आली होती. आरोपीचा विवाह झाला असून त्याला अपत्य देखील असल्याची माहिती समोर आली. गाय चारा खात असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे. महिलांप्रमाणेच आता प्राण्यांवर देखील अशा हैवानी कृत्याच्या घटना घडू लागलेल्या आहेत. अशातच प्राण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.