Crime News : तामिळनाडूमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बापाने आपल्या तीन निष्पाप मुलांचा गळा चिरून खून केला आणि त्यानंतर स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. ही घटना पत्तुकोट्टईजवळील पेरियाकोट्टई गावातील आहे. आरोपी विनोथ कुमार याने पत्नी वेगळी राहू लागल्यामुळे रागाच्या भरात हे पाऊल उचलले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
पहिले मुलांना मिठाई दिली, मग केला खून
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विनोथ कुमार याचं लग्न नित्याशी झालं होतं. त्यांना तीन मुलं होती — 11 वर्षांची ओविया, 8 वर्षांची कीर्ती आणि 5 वर्षांचा ईश्वर. गेल्या सहा महिन्यांपासून दाम्पत्यामध्ये वाद सुरू होता आणि ते वेगवेगळं राहत होते. नित्या आपल्या माहेरी राहत होती, तर मुलं वडिलांसोबत मधुकुर गावात राहत होती.
काही दिवसांपूर्वी विनोथनं नित्याशी पुन्हा एकत्र राहण्याचा प्रयत्न केला, पण तिनं नकार दिला. त्यामुळे विनोथ खूप खचला. शुक्रवारी त्यानं आपल्या मुलांसाठी मिठाई आणली, त्यांना ती दिली आणि त्यानंतर तिन्ही मुलांचा गळा चिरून खून केला.
हेही वाचा : मुंडकं नसलेल्या मृतदेहासोबत 3 महिने राहिली एकाच घरात... 'असा' बनवला प्लॅन! पोलीसही म्हणाले काय हा प्रकार?
हत्या केल्यानंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण
घटनेनंतर विनोथनं स्वतः थेट पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. मधुकुर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, घटना घडत असताना घरात अन्य कोणीही उपस्थित नव्हतं.
पोलिसांनी सुरू केला सखोल तपास
तिन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले असून, हत्येमागील कारणांची सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात समोर आलं आहे की विनोथ मानसिक ताणाखाली होता आणि वैवाहिक वादामुळे अत्यंत त्रस्त झाला होता. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला आहे. ग्रामस्थ म्हणतात की, विनोथ आपल्या मुलांवर खूप प्रेम करायचा, त्यामुळे त्याचं हे पाऊल सर्वांसाठी धक्कादायक आहे. पोलिस आता हेही शोधत आहेत की ही हत्या विनोथनं आधीच आखलेली होती का, की ती रागाच्या भरात केलेली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
वडिलांचे गावातील तरुणीसोबत अनैतिक संबंध! पण पुढे घडलं असं की ज्याचा तुम्ही नाही करू शकत विचार!
ADVERTISEMENT
