पुरुषांसोबत लव्ह, नंतर से#, व्हिडिओ रेकॉर्ड करत ब्लॅकमेल अन् पैसे उकळायची, पोलिसांनी उघडं पाडलं पितळ

crime news : एका महिलेनं माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य केलं आहे. महिला पुरुषांना नादाला लावायची आणि नंतर जवळीक संबंध बनवत शरीरसंबंध ठेवायची आणि नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करत पुराषांना ब्लॅकमेल करायची.

crime news

crime news

मुंबई तक

• 04:00 PM • 13 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य

point

एकूण प्रकरण काय? 

point

तिने अनेकांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं

Crime News : एका महिलेनं माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य केलं आहे. महिला पुरुषांना नादाला लावायची आणि नंतर जवळीक संबंध बनवत शरीरसंबंध ठेवायची आणि नंतर व्हिडिओ रेकॉर्ड करत पुराषांना ब्लॅकमेल करायची. असं लज्जास्पद कृत्य करणाऱ्या महिलेचं नाव लवी सिंग असे आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सोलापूरात पोलीस अंमलदाराचा झोपेत खाटेवरून पडून मृत्यू, कुटुंब पडलं वाऱ्यावर, पंचनाम्यातून काय उलगडलं?

एकूण प्रकरण काय? 

याच प्रकरणात तिने काही पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचं बोललं जातं. तिचा यामागे एकटीचा हात नव्हता, संपूर्ण टोळी तिच्या पाठीशी असल्याचं बोललं जातंय. याच प्रकरणात आता पोलिसांनी लवी सिंगला अटक केली आहे. 

लवी सिंगने तिघांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शरीरसंबंध ठेवून नंतर त्यांचे व्हिडिओ बनवले आणि ब्लॅकमेल करत लाखो रुपयांना गंडा घालण्याचे काम केले. त्यानंतर लवी सिंगने केलेल्या कारवाया आता उघड झाल्या. तेव्हा तिच्याकडून अडकलेल्या एका पुरुषाच्या पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली. पीडितेनं पोलिसांना एकूण घटनेची माहिती दिली की, एका महिलेने तिच्या पतीला जाळ्यात अडकवले होते आणि तो सतत त्याच्याकडून पैसे वसूल करत होता.

तिने अनेकांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं

या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. लवी सिंगचे अधिकाधिक प्रकरणं उघडकीस येऊ लागली. हे सर्व बघून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्काच बसला होता. तपासातून दिसून आले की, लवी ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या व्यक्तींना लक्ष करायची. 

हे ही वाचा : बायको असताना दुसरीला पटवलं, नंतर पळवून नेत विवाह केला, तब्बल 80 दिवस हनिमून, नंतर मोठं गुपित समोर

या प्रकरणात तरुणी ही अशा लोकांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवत होती. त्यानंतर तिने काही लोकांकडून 10 लाख रुपये उकळले होते. सध्या पोलीस तिच्या बँक खात्याची डिटेल्सची चौकशी करत आहेत. 

    follow whatsapp