सोलापूरात पोलीस अंमलदाराचा झोपेत खाटेवरून पडून मृत्यू, कुटुंब पडलं वाऱ्यावर, पंचनाम्यातून काय उलगडलं?
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका पोलीस अंमलदाराचा झोपेतच खाटेवरून खाली पडून मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोलापूर जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना

पोलीस अंमलदाराचा झोपेतच खाटेवरून खाली पडून मृत्यू

पंचनाम्यातून काय उलगडलं?
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका पोलीस अंमलदाराचा झोपेतच खाटेवरून खाली पडून मृत्यू झाला आहे. मृत पोलीस अंमलदाराचं नाव संभाजी शिवाजी दोलतोंडे वय 32 राहणार अरविंद धाम, पोलीस वसाहत सोलापूर असे त्यांचं नाव आहे. त्यांच्या मृत्यूनंतर पंचनामा केल्यानंतर ही घटना समोर आली आहे. या घटनेने सोलापूर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : बायको असताना दुसरीला पटवलं, नंतर पळवून नेत विवाह केला, तब्बल 80 दिवस हनिमून, नंतर मोठं गुपित समोर
ते बेडवर झोपले होते नंतर...
संभाजी दोलतोंडे यांच्या पत्नीने डॉक्टरांना सांगितलं की, ते बेडवर झोपले होते. पहाटेच्या सुमारास ते झोपेत असताना ते बेडवरूनच खाली कोसळले. त्यांना डोक्याच्या मागील बाजूर जबर मार लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना उलटी देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा कुटुंबियांनी त्यांना सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचे घोषित केले.
कुटुंबासमोर आर्थिक प्रश्न
त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आला असता, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती. घरात एकटेच नोकरी करणारे संभाजी दोलतोंडे यांच्यावरच कुटुंबाचा आर्थिक भार होता, पण आता त्यांच्या जाण्याने कुटुंबाला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावं लागणार आहे.
हे ही वाचा : काँग्रेसला सोबत घ्यावं, अशी राज ठाकरेंची देखील इच्छा; संजय राऊत यांचं वक्तव्य
संभाजी यांना एक आठ वर्षाची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा आहे.त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा आधार गेला आहे.संभाजी दोलतोडे अंत्यविधी यांच्या मूळ गावी उपळाई खुर्द येथे करण्यात आला.संभाजी यांच्या अंत्यविधीला मोठी गर्दी असल्याचं सांगण्यात येत आहे.