मुंडकं नसलेल्या मृतदेहासोबत 3 महिने राहिली एकाच घरात... 'असा' बनवला प्लॅन! पोलीसही म्हणाले काय हा प्रकार?
एका महिलेला तिच्या घरात तिच्या रूममेटचा मृतदेह सापडला, पण याबाबत पोलिसांना आणि कुटुंबाला कळवण्याऐवजी, ती तीन महिने त्याच घरात मृतदेहासोबत राहिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मृतदेहासोबत 3 महिने राहिली एकाच घरात...

'असा' बनवला प्लॅन! पोलिसांना सुद्धा बसला धक्का
Crime News: एका महिलेला तिच्या घरात तिच्या रूममेटचा मृतदेह सापडला, पण याबाबत पोलिसांना आणि कुटुंबाला कळवण्याऐवजी, ती तीन महिने त्याच घरात मृतदेहासोबत राहिली. ही धक्कादायक बातमी नेमकी कुठे घडली? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
हे प्रकरण फ्रान्सच्या कार्पेंट्रास शहरातील आहे, येथे लिलू जी. (काल्पनिक नाव) नावाची 29 वर्षीय महिला एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होती. काही महिन्यांपूर्वी, पास्कल बी. नावाचा एक बेघर असलेला साठ वर्षांचा पुरूष तिच्यासोबत राहायला आला. परंतु लवकरच, शेजाऱ्यांना लक्षात आलं की लिलू कुठेच दिसत नाहीये आणि तिच्या फ्लॅटमधून एक विचित्र, घाणेरडा वास येऊ लागला.
डोकं नसलेला एक मृतदेह
शेजाऱ्यांकडून तक्रारी आल्यानंतर, इमारतीच्या गार्डिअनने सफाई कामगारांना बोलावलं. सफाई कामगारांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि त्यावेळी घरातील दृश्याने सर्वांनाच धक्का बसला. सोफ्यामध्ये कुजलेला आणि डोकं नसलेला एक मृतदेह आढळला. तो मृतदेह पास्कल बी. चा असून तो गेल्या काही महिन्यांपासून लिलूसोबत त्याच फ्लॅटमध्ये राहत असल्याचं तपासात समोर आलं.
हे ही वाचा: दोन्ही मित्रांचे प्रेमसंबंध! समलैंगिक संबंधातून घडली भयानक घटना; नंतर, यूट्यूबवर व्हिडीओ बघून भलताच गेम
आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर
तसेच, पोलिसांच्या तपासादरम्यान, लिलू मानसिकदृष्ट्या अस्थिर असून ती स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर सारख्या गंभीर आजारांनी ग्रासली होती, असं समोर आलं. त्यामुळे तिला बऱ्याचदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेव्हा लिलूला पास्कल मृत असल्याचं आढळलं तेव्हा तिने त्याचा मृतदेह सोफ्यावर बसलेल्या अवस्थेतच ठेवला जणू तो जिवंतच आहे, असं म्हटलं जात आहे.