डिनरसाठी पबमध्ये गेला! नंतर, बाथरूममध्ये गेला अन्... दरवाजा तोडला तर समोर मृतदेह!

मुंबई तक

एका मोठ्या पबच्या बाथरूममध्ये 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्ती ही बँक मॅनेजर म्हणून कार्यरत होती.

ADVERTISEMENT

बाथरूममध्ये गेला अन् आत घडलं असं काही...
बाथरूममध्ये गेला अन् आत घडलं असं काही...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पबच्या बाथरूममध्ये सापडला बँक मॅनेजरचा मृतदेह

point

दरवाजा तोडल्यानंतर 'त्या' अवस्थेत मृतदेह आढळला

Crime News: गुरुवारी (9 ऑक्टोबर) बंगळुरूच्या राजराजेश्वरी नगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं होतं. येथील एका मोठ्या पबच्या बाथरूममध्ये 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्ती ही बँक मॅनेजर म्हणून कार्यरत होती. 

मेघराच बाथरूममध्ये गेला अन्...

रात्री जवळपास साडे दहा वाजताच्या सुमारास मेघराज नावाचा एक तरुण आपल्या तीन मित्रांसोबत पबमध्ये डिनर आणि ड्रिंकसाठी गेला होता. त्याच मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पबमध्ये गेल्यानंतर सुरूवातीला सर्व काही ठिक होतं. अगदी मजा मस्करी करत चौघा मित्रांनी जेवण केलं आणि बिल भरून बाहेर निघण्याच्या तयारीत होते. तेव्हा अचानक मेघराज म्हणाला, "मला थोडी चक्कर येतेय, मी वॉशरूममध्ये जातो." त्यानंतर, मेघराज बाथरूममध्ये गेला आणि त्याचे मित्र त्याची वाट बघत बाहेर थांबले होते. मात्र, बराच काळ मेघराज पबमधून बाहेर आलाच नाही. 

हे ही वाचा: पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर मुंबईत अटक! पालघरच्या हत्याप्रकरणात पोलिसांना यश

बाथरूममध्ये बँक मॅनेजरचा मृतदेह 

बराच काळ वाट पाहिल्यानंतर, त्याचे मित्र पुन्हा पबमध्ये गेले आणि सगळीकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी, बाथरूमचा दरवाजा आतून बंद आढळल्याने सर्वांनाच संशय आला. त्यावेळी, पबच्या मॅनेजरला बोलवण्यात आलं. बराच काळ दरवाजा ठोठवल्यानंतर सुद्धा आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, दरवाजा तोडण्यात आला आणि आतील दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. 

हे ही वाचा: 'विद्यार्थिनी रात्री 12.30 वाजता कॅम्पसच्या बाहेर कशी गेली?..' अत्याचार प्रकरणात ममता बॅनर्जींचा कॉलेज प्रशासनाला सवाल

पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती 

बँक मॅनेजर मेघराज बाथरूममध्ये खाली फरशीवर पडला होता. त्याच्या बाजूला त्याचा मोबाईल होता आणि सिंकच्या खाली फुटलेला ग्लास आढळला. त्यानंतर, या घटनेबद्दल लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघराज स्वत: बाथरूममध्ये गेला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर, काहीच हालचाल झाली नाही. शेवटी, दरवाजा तोडल्यानंतर आत मॅनेजरचा मृतदेह सापडला. पोलिसांनी क्राइम ब्रांच बोलवून सर्व पुरावे गोळा केले. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सची प्रतिक्षा आहे. रिपोर्ट्सवरून मृत्यूमागचं नेमकं कारण लवकरच समोर येईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp