पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर मुंबईत अटक! पालघरच्या हत्याप्रकरणात पोलिसांना यश

मुंबई तक

2020 मध्ये पालघर जिल्ह्यातील एका हत्येच्या प्रकरणातील आरोपी महिला पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून फरार होती, मात्र त्या महिलेला आता मुंबईत अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर मुंबईत अटक!
पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर मुंबईत अटक!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर मुंबईत अटक!

point

पालघरच्या हत्याप्रकरणात पोलिसांना यश

Mumbai Crime: 2020 मध्ये पालघर जिल्ह्यातील एका हत्येच्या प्रकरणात एका महिलेला आरोपी ठरवण्यात आलं होतं. संबंधित महिला ही पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून फरार होती, मात्र त्या महिलेला आता मुंबईत अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने यासंदर्भात न्यूज एजन्सीला माहिती देताना ही माहिती दिली. 

गळा दाबून हत्या

सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी या प्रकरणासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव  डोलरिन अफरीन अहमद खान (27) असून ती नालासोपारा येथील रहिवासी होती. आरोपी महिलेने 12 फ्रेब्रुवारी 2020 मध्ये पालघर जिल्ह्यातील अर्नाळा शहरात प्रदीप दयाशंकर राय (23) याचा गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर, आरोपीने ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी महिलेचा ठाणे जिल्ह्यातील बदलापुर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीसोबत पैशांवरून झालेला मोठा वाद हेच ह्या हत्येमागचं मुख्य कारण असल्याचं समोर आलं. त्यानंतर, भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा: 'विद्यार्थिनी रात्री 12.30 वाजता कॅम्पसच्या बाहेर कशी गेली?..' अत्याचार प्रकरणात ममता बॅनर्जींचा कॉलेज प्रशासनाला सवाल

आरोपी महिलेच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न 

पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी महिला फरार झाल्यामुळे पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 299 अंतर्गत आरोपपत्र दाखल केलं होतं, जे फरार आरोपीच्या अनुपस्थितीत पुरावे नोंदवण्याची परवानगी देतं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp