प्रेमानंद महाराजांचं दर्शन देतो असं सांगितलं, नंतर हॉटेलमध्ये नेत प्येय पदार्थात औषध मिसळत नको तेच... व्हिडिओ बनवत..

मुंबई तक

Crime News : प्रेमानंद महाराजांचे दर्शन करण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तिच्या प्येय पदार्थात औषध मिळले आणि तरुणी जागीच बेशुद्ध पडली. त्यानंतर तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

crime news a young woman was sexually abused
crime news a young woman was sexually abused
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेमानंद महाराजांचे दर्शनाचे आमिष दाखवले

point

नंतर तरुणीला हॉटेलवर नेले

point

नको तेच करत, धक्कादायक घटना

Crime News : प्रेमानंद महाराजांचे दर्शन करण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तिच्या प्येय पदार्थात औषध मिळले आणि तरुणी जागीच बेशुद्ध पडली. त्यानंतर तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मथुरा येथे घडली आहे. महिलेला फसवून हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव सुंदरम राजपूत असे आहे. 

हे ही वाचा : बीड हादरलं! सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, 15 जणांनी महिलांवर धारधार कोयत्याने रक्तबंबाळ होईपर्यंत...

प्रेमानंद महाराजांचे दर्शन देतो असे सांगत हॉटेलमध्ये नेलं.. 

एका तरुणाने एका तरुणीला प्रेमानंद महाराजांचे दर्शन देतो असे सांगून आग्राहून मथुरा येथे आणले. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तो तरुण एवढ्यावरच गप्प न बसता त्याने तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करून ठेवले आहेत. आरोपीने धमकावले की, व्हिडिओ व्हायरल करण्याच्या बहाण्याने हा घृणास्पद गुन्हा करण्यात आला होता. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात पोलीस टाण्यात कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आता तुरुंगात पाठवले आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp