वडिलांचे गावातील तरुणीसोबत अनैतिक संबंध! पण पुढे घडलं असं की ज्याचा तुम्ही नाही करू शकत विचार!
एका 5 वर्षांच्या निष्पाप मुलाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. वडिलांचे प्रेमसंबंध हेच या घटनेमागचं कारण असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वडिलांचे गावातील तरुणीसोबत अनैतिक संबंध

सूडाच्या भावनेतून 5 वर्षांच्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या
Crime News: बिहारच्या जहानाबाद येथे एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे एका 5 वर्षांच्या निष्पाप मुलाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी (8 ऑक्टोबर) रात्री गावातील एका घराच्या मागे पोत्यात पीडित मुलाचा मृतदेह आढळला.
वडिलांचे गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध
संबंधित घटना टेहटा पोलीस स्टेशन परिसरातील पश्चिमी सरेन गावात घडल्याची माहिती आहे. लहान मुलाच्या या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुधीर कुमार उर्फ भीम यादव यांचा आर्यन कुमार नावाचा 5 वर्षीय मुलगा अशी मृत मुलाची ओळख समोर आली आहे. मुलाच्या वडिलांचे गावातील एका तरुणीसोबत असलेले प्रेमसंबंध हेच या घटनेमागचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित तरुणीच्या कुटुंबियांना या प्रेमप्रकरणाबद्दल कळताच त्यांनी सूड उगवण्याच्या भावनेतून निष्पाप मुलाची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा: Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी, सप्टेंबर महिन्याचे पैसे आता मिळणार!
या प्रकरणात पोलिसांनी गावातीलच दोन महिलांसह तीन लोकांना संशयाच्या आधारे अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर तरुणीचे कुटुंबीय फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपींच्या शोधात छापे टाकले जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: सी लिंक, BKC ला विमानतळाशी जोडणारा नवीन सबवे, 3 फेज अन् रस्ता तर... नव्या प्रोजेक्टविषयी जाणून घ्या
गावकऱ्यांची पोलिसांकडे मागणी
पीडित कुटुंबियांच्या मते, आर्यन संध्याकाळी उशीरापर्यंत घराजवळ खेळत होता. यादरम्यान शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने त्याला गायब केलं असल्याचा संशय आहे. बराच काळ शोध घेतल्यानंतर आर्यनचा मृतदेह ईश्वरी यादवच्या घरामागे एका पोत्यात आढळला. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती आहे. या निर्घृण हत्येनंतर गावकरी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.