Crime News: एका महिलेला तिच्या घरात तिच्या रूममेटचा मृतदेह सापडला, पण याबाबत पोलिसांना आणि कुटुंबाला कळवण्याऐवजी, ती तीन महिने त्याच घरात मृतदेहासोबत राहिली. ही धक्कादायक बातमी नेमकी कुठे घडली? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
हे प्रकरण फ्रान्सच्या कार्पेंट्रास शहरातील आहे, येथे लिलू जी. (काल्पनिक नाव) नावाची 29 वर्षीय महिला एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होती. काही महिन्यांपूर्वी, पास्कल बी. नावाचा एक बेघर असलेला साठ वर्षांचा पुरूष तिच्यासोबत राहायला आला. परंतु लवकरच, शेजाऱ्यांना लक्षात आलं की लिलू कुठेच दिसत नाहीये आणि तिच्या फ्लॅटमधून एक विचित्र, घाणेरडा वास येऊ लागला.
डोकं नसलेला एक मृतदेह
शेजाऱ्यांकडून तक्रारी आल्यानंतर, इमारतीच्या गार्डिअनने सफाई कामगारांना बोलावलं. सफाई कामगारांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि त्यावेळी घरातील दृश्याने सर्वांनाच धक्का बसला. सोफ्यामध्ये कुजलेला आणि डोकं नसलेला एक मृतदेह आढळला. तो मृतदेह पास्कल बी. चा असून तो गेल्या काही महिन्यांपासून लिलूसोबत त्याच फ्लॅटमध्ये राहत असल्याचं तपासात समोर आलं.
हे ही वाचा: दोन्ही मित्रांचे प्रेमसंबंध! समलैंगिक संबंधातून घडली भयानक घटना; नंतर, यूट्यूबवर व्हिडीओ बघून भलताच गेम
आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर
तसेच, पोलिसांच्या तपासादरम्यान, लिलू मानसिकदृष्ट्या अस्थिर असून ती स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर सारख्या गंभीर आजारांनी ग्रासली होती, असं समोर आलं. त्यामुळे तिला बऱ्याचदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेव्हा लिलूला पास्कल मृत असल्याचं आढळलं तेव्हा तिने त्याचा मृतदेह सोफ्यावर बसलेल्या अवस्थेतच ठेवला जणू तो जिवंतच आहे, असं म्हटलं जात आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट! 'इतक्या' स्टील ब्रिजचं बांधकाम पूर्ण...
लिलूला अटक झाली पण...
पण काही दिवसांनंतर, मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आणि त्यावेळी लिलूने तो सोफ्याच्या बेडमध्ये लपवला. लिलू बऱ्याच काळ्या प्लास्टिक पिशव्या फेकताना दिसली ज्यामध्ये कदाचित पास्कलचे डोके आणि शरीराचे अवयव असल्याचं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. अखेर, सखोल चौकशीनंतर लिलूला अटक करण्यात आली. सुरुवातीला तिच्यावर हत्येचा आरोप लावण्याच आला होता, परंतु पुराव्याअभावी हे सिद्ध होऊ शकलं नाही. खरंतर, लिलूची मानसिक स्थिती आणि बालपणात त्याने भोगलेल्या छळाचा विचार करून न्यायालयाने तिला चार महिन्यांची सस्पेंडेड शिक्षा सुनावली.
ADVERTISEMENT
