MBBS चं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार! निर्जन जंगलात फरफटत नेलं अन्...

एका खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

निर्जन जंगलात फरफटत नेलं अन्...

निर्जन जंगलात फरफटत नेलं अन्...

मुंबई तक

• 12:07 PM • 12 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

MBBS चं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार!

point

आरोपींनी निर्जन जंगलात फरफटत नेलं अन् केलं घृणास्पद कृत्य

Gang Rape Case: एका खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील दुर्गापुरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. येथे, तीन तरुणांनी मिळून कॉलेजमधील एक विद्यार्थिनीवर बलात्कार केला. प्रकरणातील पीडिता ही ओडिशाच्या जलेश्वर येथील मूळ रहिवासी असून ती डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन दुर्गापुरला शिक्षण घेण्यासाठी आली होती. 

हे वाचलं का?

जंगलात फरफटत नेलं अन् बलात्कार...

शुक्रवारी (10 ऑक्टोबर) रात्री पीडिता तिच्या मैत्रिणीसोबत डिनरला कॉलेजच्या बाहेर गेली होती. दोघी रस्त्यावरून जात असताना अचानक, तीन अज्ञात तरुण त्यांच्यासमोर आले. त्या तरुणांना पाहून पीडितेची मैत्रिण घाबरली आणि तिथून तिने पळ काढला. मात्र, त्यावेळी पीडित तरुणी ही आरोपींच्या कचाट्यात सापडली. तेव्हा एका तरुणाने पीडितेचा मोबाईल हिसकावून घेतला आणि इतर दोघांनी तिला जवळच्या जंगलात फरफटत नेलं. निर्जन जंगलात तिन्ही नराधमांनी तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. इतकेच नव्हे तर, घटनेनंतर तरुणांनी पीडितेला याबद्दल कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, शेवटी जाता जाता आरोपींनी तिला सांगितलं की मोबाईल पाहिजे असेल तर, पैसे द्यावे लागतील.

हे ही वाचा:  20 वर्षे लहान तरुणासोबत जुळले पाच मुलांच्या आईचे सूत! लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहिली... पण, पतीची आठवण आली अन् भररस्त्यात...

या भयानक घटनेनंतर, पीडिता कशीबशी जखमी अवस्थेत तिच्या कॉलेजमध्ये पोहोचली. त्यानंतर, कॉलेजमधील विद्यार्थ्यांनीच तिला लगेच रुग्णालयात दाखल केलं. तरुणीची प्रकृती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शनिवारी ओडिशामधील पीडितेच्या घरच्यांपर्यंत ही माहिती पोहोचल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. ते तातडीने दुर्गापुरला पोहोचले. आता, तरुणीचे आई-वडील आरोपीच्या अटकेची पोलिसांकडे मागणी करत आहेत. 

हे ही वाचा: नाशिक: धावत्या ट्रेनमध्ये तब्बल 56 लाख रुपयांचे दागिने लंपास... RPF अधिकाऱ्यांनी आरोपीला ठोकल्या बेड्या!

पोलिसांचा तपास 

पोलिसांनी यासंबंधी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून तिच्या मैत्रिणीची सुद्धा चौकशी केली जात आहे. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, तसेच फॉरेन्सिक टीमकडून पुरावे सुद्धा गोळा करण्यात येत आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली असून त्यांनी दुर्गापूरला एक पथक पाठवलं आहे.

    follow whatsapp